वगळलेल्या मतदारांच्या अपिलांना प्राधान्य द्या! सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
राष्ट्रीय

वगळलेल्या मतदारांच्या अपिलांना प्राधान्य द्या! सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून नाव वगळल्याविरोधात दाखल अपिलांची सुनावणी प्राधान्याने घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले. तसेच, अपिलांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याचे निर्देशही दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेतून नाव वगळल्याविरोधात दाखल अपिलांची सुनावणी प्राधान्याने घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निवडणूक आयोगाला दिले. तसेच, अपिलांची सुनावणी करणाऱ्या न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्याचे निर्देशही दिले.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्या. जॉयमाल्या बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींशी सल्लामसलत करून न्यायाधिकरणांची संख्या वाढवण्यास सांगितले. मतदारांची नावे वगळण्याविरोधातील अपील आणि नावे समाविष्ट करण्याविरोधातील अपील अशा दोन श्रेणींमध्ये प्रकरणे विभागण्याचे निर्देश दिले. नाव वगळण्याविरोधातील अपीलांना अधिक प्राधान्य द्यावे, तर नाव समाविष्ट करण्याविरोधातील अपील नंतर सुनावणीस घ्यावीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

कोलकात्यात विविध ठिकाणी न्यायाधिकरणांसाठी सोयीची जागा उपलब्ध करून देण्यास आणि कोलकाता महानगरपालिका क्षेत्रातील अपीलांना प्राधान्य देण्यासही सांगितले. याचिकाकर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनी, सुमारे ३८ लाख अपील अर्ज दाखल असून त्यापैकी केवळ एक लाख, निकाली निघाल्याचे सांगितले. सुमारे २२ लाख अपील अर्ज प्रलंबित असल्याचा दावा त्यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी