राष्ट्रीय

पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; फेरविचार करण्यासही नकार

Swapnil S

दिल्ली : पक्षांतर बंदी कायद्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या खंडपीठाने पक्षांतर बंदी कायद्याचे ‘१० वे परिशिष्ट’ उचलून धरल्याने या कायद्याचा फेरविचार करण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे.

घाऊक प्रमाणावर होणाऱ्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी ५२ वी घटनादुरुस्ती करून १९८५ मध्ये पक्षांतर बंदी कायदा अस्तित्वात आला़ पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले खासदार व आमदार यांनी पक्ष सोडल्यास त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होऊन त्यांची निवड रद्द करण्यात येते.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या़ जे. बी. पारडीवाला आणि न्या़ मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीस आली होती़ याचिकाकर्त्याने आपली बाजू मांडताना सांगितले की, दहाव्या परिशिष्टाचा समावेश करण्याच्या निर्णयाला माझ्या याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे़ मात्र, दहावे परिशिष्ट वगळून पक्षांतर बंदीविरोधातील याचिका विचारातच घेतली जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले़ पक्षातील व्यक्ती कितीही वेळा पक्ष बदलू शकते, त्यावर कोणतेही बंधन टाकलेले नाही़ परंतु ५२ वी घटनादुरुस्ती ही लोकप्रतिनिधीच्या पक्षांतराला आळा घालण्यासाठी करण्यात आलेली आहे़.

Mumbai : मतदान वेगाने होण्यासाठी सुसूत्रीकरण; एका केंद्रावर आता सरासरी १२०० मतदार, मुंबईत आणखी २१८ केंद्रांची भर

Mumbai : कोस्टल रोड आता सातही दिवस खुला; पण 'या' वेळेतच करता येणार प्रवास!

केंद्र सरकारला मोठा झटका! सुधारित आयटी नियम अखेर रद्द; घटनाबाह्य असल्याचा हायकोर्टाचा निर्णय

Mumbai Local Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या...रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवरही १० तासांचा ब्लॉक

सणांपूर्वीच महागाईने सर्वसामान्यांचा खिसा कापला! खाद्य तेल १२ टक्क्याने महाग