सुप्रीम कोर्ट संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

अबू सालेमच्या सुटकेची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी गँगस्टर अबू सालेमची सुटका करण्याबाबतची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

Swapnil S

नवी दिल्ली : मुंबईत १९९३ मध्ये घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी गँगस्टर अबू सालेमची सुटका करण्याबाबतची याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

सालेमच्या वकिलाने युक्तिवाद केला होता की, अबू सालेमने २५ वर्षांची शिक्षा पूर्ण केली आहे, त्यामुळे त्याला सोडण्यात यावे. सुप्रीम कोर्टाने सालेमच्या याचिकेवर सुनावणी करताना त्याला कठीण शब्दांत फटकारले. कोर्टाने म्हटले की, तुम्ही समाजाचे भले करण्यासाठी तुरुंगात नाही आहात. तुम्हाला टाडा कायद्यांतर्गत शिक्षा झाली आहे. कोर्टाने तत्काळ दिलासा देण्याची मागणी फेटाळली आणि सालेमला हायकोर्टात जाण्याचे निर्देश दिले. टाडाअंतर्गत दोषी आणि त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याने विशेष दिलासा किंवा सवलत देण्याचे कोणतेही कारण नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले.

पोर्तुगालमधून भारतात

अबू सालेमला २००२ मध्ये पोर्तुगालमध्ये बनावट पासपोर्टच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली. पोर्तुगालने अबू सालेमला भारताला सोपवताना अट ठेवली होती की, भारत त्याला फाशीची शिक्षा देणार नाही आणि २५ वर्षांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा देणार नाही. भारताच्या आश्वासनानंतर पोर्तुगालच्या न्यायालयाने फेब्रुवारी २००४ मध्ये प्रत्यार्पणाला मंजुरी दिली. ११ नोव्हेंबर २००५ रोजी अबू सालेमला पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले. ही अट महत्त्वाची होती, कारण पोर्तुगालमध्ये मृत्यूदंड नाही आणि कारावासाची कमाल मुदत मर्यादित आहे. त्यामुळे पोर्तुगालने भारताकडून याच अटीवर प्रत्यार्पण मान्य केले होते.

१९९३ चे बॉम्बस्फोट

१९९३ चे मुंबई बॉम्बस्फोट हे भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि भयानक साखळी बॉम्बस्फोटांपैकी एक होते. हे सुनियोजित दहशतवादी हल्ले १२ मार्च १९९३ रोजी दुपारी सुमारे १:३० ते ३:४० या वेळेत झाले. या दिवशी मुंबईत १२-१३ ठिकाणी एकामागोमाग आरडीएक्सने भरलेल्या कारबॉम्बचे स्फोट झाले. मुख्यतः शहरातील व्यस्त आणि महत्त्वाच्या भागांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, एअर इंडिया बिल्डिंग इत्यादींचा समावेश होता.

CJP Protest : अभिजीत दिपकेंना टायफॉइडची लागण; VIDEO शेअर करत म्हणाले- 'आंदोलन थांबणार नाही'

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलनामात रंगली पंढरी; पाहा खास क्षणचित्रे

डेटा शेअरवर बंदी; भारताबाहेर डेटा जाऊ देण्यास अटकाव, कम्युनिकेशन्स इन्फ्रास्ट्रक्चर पुरवठादारांवर निर्बंध

सोन्याच्या दरात २ हजारांची घसरण; भाव १.४७ लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर, चांदी ५,००० रुपयांनी स्वस्त

Pune : ‘गुन्हेगार ठरवल्यास पोलीस उपायुक्तांच्या घराबाहेर आत्महत्या करेन’; माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा इशारा