गोध्रा जळीतकांड प्रकरणातील दोषीची जन्मठेप स्थगित  संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

गोध्रा जळीतकांड प्रकरणातील दोषीची जन्मठेप स्थगित

सन २००२ मधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांड (गोध्रा) प्रकरणातील दोषी इरफान सिराज पाडा याची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वैद्यकीय कारणास्तव स्थगित केली. हा दोषी दीर्घकाळ कारावासात आणि विविध आजारांनी ग्रस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

Swapnil S

नवी दिल्ली : सन २००२ मधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांड (गोध्रा) प्रकरणातील दोषी इरफान सिराज पाडा याची जन्मठेपेची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी वैद्यकीय कारणास्तव स्थगित केली. हा दोषी दीर्घकाळ कारावासात आणि विविध आजारांनी ग्रस्त असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्या. एम. एम. सुंदरेश आणि न्या. प्रसन्ना बी. वराळे यांच्या खंडपीठाने पाडा याच्या याचिकेवर सुनावणी करताना, त्याने १८ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्याचे आणि तो विविध वैद्यकीय समस्यांनी त्रस्त असल्याचे नमूद केले. शिक्षा स्थगितीची याचिका प्रामुख्याने वैद्यकीय कारणांवर आधारित असल्याचे न्यायालयाने सांगितले. राज्य सरकारनेही दोषीच्या वैद्यकीय स्थितीबाबत आक्षेप घेतला नसल्याचेही खंडपीठाने स्पष्ट केले.

गुजरात सरकारच्या वकिलांनी प्रकरण गंभीर असल्याचे नमूद केले; मात्र वैद्यकीय कारणास्तव शिक्षा स्थगित करण्यास विरोध केला नाही. २७ फेब्रुवारी २००२ रोजी साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ डब्यात आग लागून ५८ जणांचा मृत्यू झाला होता. अयोध्येहून कारसेवकांना घेऊन जाणाऱ्या या रेल्वेतील जळीतकांडानंतर गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : गुरुवारी, शुक्रवारी पाणीबाणी; धारावी, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, भांडुपमध्ये पाणी नाही

अतिवेगाचे १३ बळी; राज्यात विविध अपघातांत २८ जखमी, १० गंभीर

Mumbai : आता १३०० झाडांचा बळी; गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी पालिकेने झाडांवर चिकटविल्या नोटिसा

नफावसुलीने पडझड; सेन्सेक्स १,४८४ अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ५.१९ लाख कोटी बुडाले

नेपाळला १५ हजार कोटींच्या मदतीचे पॅकेज; पंतप्रधान मोदी-बालेन शाह यांची आठ करारांवर स्वाक्षरी