राष्ट्रीय

केंद्र सरकारची सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना आजपासून सुरु होणार

वृत्तसंस्था

केंद्र सरकारची सॉव्हरेन गोल्ड बाँड ही योजना सोमवारपासून म्हणजेच २२ ऑगस्टपासून सुरू होत आहे. ही योजना फक्त ५ दिवसांसाठी खुली असेल. यामध्ये गुंतवणूकदारांना कोणतेही सोने किंवा नाणे प्रत्यक्ष मिळणार नाही, परंतु तुम्ही सोन्याची किंमत बाजारापेक्षा कमी दराने निश्चित करून गुंतवणूक करू शकता. त्याचा पहिला इश्यू जूनमध्ये उघडला गेला आणि दुसरा इश्यू २२ ऑगस्टला उघडेल.

सॉव्हरेन गोल्ड बाँड योजना वार्षिक २.५ टक्के व्याजदर देते. त्याच्या मुदतपूर्तीपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला कोणताही कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागणार नाही. ही योजना खूप फायदेशीर आहे आणि पहिल्या इश्यूला गुंतवणूकदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

गोल्ड बॉण्ड्स कोणत्याही ग्राहक बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एसएचसीआयएल), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआयएल), पोस्ट ऑफिस, एनएसई आणि बीएसईकडून खरेदी केले जाऊ शकतात. एजंटमार्फतही गुंतवणूक करता येते. सॉव्हरेन गोल्ड बाँडची मॅच्युरिटी ८ वर्षे आहे. मात्र, ५ वर्षानंतरही पैसे काढता येतात.

या योजनेमध्ये जास्तीत जास्त ४ किलो सोने गुंतवले जाऊ शकते. ही मर्यादा केवळ एका आर्थिक वर्षासाठी आहे. या योजनेत किमान १ ग्रॅम सोन्यात गुंतवणूक करता येते.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

४ जूनला ठरणार खरी शिवसेना कोणाची? मतदारराजाचा कौल निर्णायक; मुंबईसह ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना आमनेसामने

कोस्टल रोड १६ तास सुरू राहणार; चाचणीनंतर वेळापत्रक होणार कायम

सुप्रियांची पुण्याईवर तर सुनेत्रांची 'बारामती मॉडेल'वर भिस्त; काका-पुतण्याची प्रतिष्ठा पणाला!

सलमानच्या घरावरील गोळीबार प्रकरण : आरोपी थापनची कोठडीत आत्महत्या; जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू