राष्ट्रीय

उद्योजकांना पाठबळ पुरविणाऱ्या अमेरिकी स्टार्टअप सेतूची सुरुवात

वृत्तसंस्था

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरियातील उद्योजकांना पाठबळ पुरविणाऱ्या ‘सेतू’ या अमेरिकी स्टार्ट अपची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाच्या मदतीने भारतातील स्टार्ट अप उद्योग निधीचा पुरवठा, विपणन तसेच व्यावसायिकीकरण यासारख्या विविध क्षेत्रात मार्गदर्शन तसेच मदत करण्याच्या उद्देशाने अमेरिका स्थित गुंतवणूकदार आणि स्टार्ट अप परिसंस्थेतील आघाडीच्या उद्योगांशी जोडले जाणार आहेत.

भारतातील स्टार्ट अप उद्योगांसाठी एक-केन्द्री समस्या समाधान केंद्र असलेल्या ‘मार्ग’ अर्थात मार्गदर्शन, सल्ला,मदत,लवचिकता आणि विकास यांच्याशी संबंधित स्टार्ट अप भारत उपक्रमाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मार्गदर्शक पोर्टलच्या माध्यमातून या परस्पर संवादाला पाठबळ पुरविले जाईल. संपूर्ण जगातील २०० हून अधिक मार्गदर्शक या उपक्रमासाठी ‘मार्ग’च्या माध्यमातून सहभागी झाले आहेत. उद्योग जगताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनेक प्रख्यात व्यक्ती आणि स्टार्ट अप परिसंस्थांकडून अर्ज सादर करण्यात आले आहेत.

प्रस्तावित एफटीएचा भारत आणि इस्रायलला फायदा - गोयल

भारत आणि इस्रायल यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारामुळे दोन्ही देशांना फायदा होईल, असे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. भारत आणि इस्रायल मे २०१०पासून मुक्त व्यापार करारासाठी वाटाघाटी करत आहेत.

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, जोपर्यंत भारताला चांगला करार मिळत नाही तोपर्यंत तडजोड करत राहणार आहे.

मुक्त व्यापार करार (एफटीए)अंतर्गत, दोन देश परस्पर व्यापार अंतर्गत घेतलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील सीमाशुल्क मोठ्या प्रमाणात कमी करतात किंवा काढून टाकतात. याशिवाय सेवांमधील व्यापाराला चालना देण्यासाठी आणि गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी ते नियम सुलभ करण्याचा प्रयत्न करतात. भारत मुख्यत्वे मौल्यवान दगड आणि धातू, रासायनिक उत्पादने आणि कापड इस्त्रायलला निर्यात करतो तर आयातीत मौल्यवान दगड आणि धातू, रासायनिक आणि खनिज उत्पादने, बेस मेटल, यंत्रसामग्री आणि वाहतूक उपकरणे यांचा समावेश होतो.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे ८ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतका आहे. यापूर्वी २०२०-२१मध्ये, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार ४.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स होता. भारताने अलीकडेच यूएई आणि ऑस्ट्रेलियासोबत मुक्त व्यापार करार केला आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम