(Photo-X/@ANI)
राष्ट्रीय

जम्मूतील बालसुधारगृहातून दोन पाकिस्तानींसह तिघेजण पळाले

जम्मूतील आरएस पुरा येथे असलेल्या बालसुधारगृहाच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीमुळे तीन कैदी सोमवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

जम्मू : जम्मूतील आरएस पुरा येथे असलेल्या बालसुधारगृहाच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीमुळे तीन कैदी सोमवारी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये दोन पाकिस्तानींचा समावेश आहे. फरार झालेल्यांची जम्मूतील बालसुधारगृहातून दोन पाकिस्तानींसह तिघेजण पळाले. ओळख पटली असून त्यापैकी एक जण आरएस पुरा येथील दबलेहर गावचा रहिवासी आहे. उर्वरित दोघे पाकिस्तानी नागरिक असून त्यांची नावे मोहम्मद सुना-उल्लाह आणि अहसान अन्वर अशी आहेत.

कैद्यांनी पळून जाताना ड्युटीवर असलेल्या दोन पोलिसांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमी पोलिसांची नावे विनय कुमार आणि प्रवीण कुमार अशी असून त्यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयातील दाखल करण्यात आले.

दोन्ही जखमी पोलिसांना प्रथमोपचार देऊन पुढील उपचारासाठी जीएमसी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. दरम्यान, जम्मू पोलिसांनी या घटनेची दखल घेत औपचारिक चौकशी सुरू केली आहे. फरार आरोपींना पकडण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून विविध ठिकाणी शोधमोहीम आणि छापे टाकले जात आहेत.

पॅराग्लायंडिंग वर्ल्ड कपचा थरार सुरू; पाचगणीच्या आकाशात देशी-विदेशी पॅराग्लायडर्सची भरारी

विजय मल्ल्याची नवीन चाल! भारतात कधी परतणार हे निश्चित सांगू शकत नाही; उच्च न्यायालयात नकारघंटा

Mumbai : लोकलमध्ये पोस्टरबाजी करणाऱ्या बंगाली बाबाला अटक; वडाळा येथे गुन्हा दाखल, १५ हजार पोस्टर्स जप्त,

अजित पवार विमान अपघात : ब्लॅकबॉक्समधून डेटा मिळविण्यासाठी भारत घेणार अमेरिकेची मदत

Bhiwandi : महापालिका महापौर निवडणुकीला वेगळे वळण; भाजपने उमेदवार बदलला; नारायण चौधरी सेक्युलर आघाडीकडे