राष्ट्रीय

UPS to NPS : पेन्शन स्कीमबाबत सरकारची मोठी घोषणा; 'यूपीएस'मधून 'एनपीएस'मध्ये एकदा बदलाची परवानगी

हा बदल करण्याची संधी फक्त एकदाच मिळेल. म्हणजेच, जर एखादा कर्मचारी UPS वरून NPS मध्ये गेला तर तो UPS मध्ये परत जाऊ शकणार नाही. हा पर्याय फक्त त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी...

Krantee V. Kale

जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल आणि निवृत्तीनंतरच्या पैशांचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीममधून बाहेर पडून ‘राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली’त (एनपीएस) जाण्याची सुविधा जाहीर करण्यात आली आहे. पण हा बदल करण्याची संधी फक्त एकदाच मिळेल. म्हणजेच, जर एखादा कर्मचारी UPS वरून NPS मध्ये गेला तर तो UPS मध्ये परत जाऊ शकणार नाही. हा पर्याय फक्त त्या कर्मचाऱ्यांसाठी आहे ज्यांनी आधीच UPS चा पर्याय निवडला आहे.

अर्थ मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलेय की, ‘यूपीएस’ची निवड केलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ‘यूपीएस’मधून ‘एनपीएस’मध्ये एकदाच आणि एकमार्गी बदल करण्याची सुविधा दिली आहे. ही बदल सुविधा ‘यूपीएस’ निवडलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या तारखेच्या किमान एक वर्ष आधी किंवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत अपेक्षित निवृत्तीच्या तारखेच्या तीन महिन्यांपूर्वी वापरता येईल.”

UPS आणि NPS मध्ये काय फरक आहे?
UPS म्हणजे युनिफाइड पेन्शन स्कीम (Unified Pension Scheme) जी सरकारने १ एप्रिल २०२५ पासून सुरू केली आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ठराविक रक्कमेची पेन्शन मिळते. तर NPS ही मार्केटशी जोडलेली योजना आहे, ज्यामध्ये तुमची पेन्शन 'कॉर्पस'च्या परफॉर्मन्सनुसार वाढते. आता सरकारने कर्मचाऱ्यांना ही संधी दिली आहे की, जर त्यांना मार्केटशी जोडलेला रिटायरमेंट फंड हवा असेल, तर ते UPS सोडून NPS मध्ये जाऊ शकतात.

१ एप्रिल २०२५ पासून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘एनपीएस’ अंतर्गत ‘यूपीएस’ हा पर्याय देण्यात आला आहे. २० जुलैपर्यंत सुमारे ३१,५५५ केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘यूपीएस’ची निवड केली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर आहे.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले