समुद्रातील रशियन तेल खरेदीचा भारताला सल्ला; अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांची माहिती  'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

समुद्रातील रशियन तेल खरेदीचा भारताला सल्ला; अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांची माहिती

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या भीती आणि किमतीतील संभाव्य वाढ कमी करण्यासाठी अमेरिकेने भारताला समुद्रातच असलेले रशियन तेल खरेदी करून ते भारतीय तेल शुद्धीकरणाकडे वळवण्याचा सल्ला दिल्याची माहिती अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी दिली.

Swapnil S

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तेलाच्या पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या भीती आणि किमतीतील संभाव्य वाढ कमी करण्यासाठी अमेरिकेने भारताला समुद्रातच असलेले रशियन तेल खरेदी करून ते भारतीय तेल शुद्धीकरणाकडे वळवण्याचा सल्ला दिल्याची माहिती अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांनी दिली. मात्र हा निर्णय अल्पकालीन आणि व्यावहारिक उपाय असून रशियाबाबत अमेरिकेच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी ‘सीएनएल’ला दिलेल्या मुलाखतीत राइट यांनी सांगितले की, त्यांनी आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून सध्या चीनमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पात उतरवण्यासाठी प्रतीक्षा करणाऱ्या रशियन कच्च्या तेलाच्या खेप भारताने खरेदी करण्याबाबत चर्चा केली. या प्रक्रियेत भारताने उत्तम सहकार्य केले आहे. मी भारतीय अधिकाऱ्यांना फोन केला, तसेच अर्थमंत्री बेसेंट यांनीही संवाद साधला. सध्या अनेक तेलवाहू जहाजे चीनमधील रिफायनरींमध्ये तेल उतरवण्यासाठी प्रतीक्षेत आहेत,” असे राइट म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘तेल चीनमध्ये उतरवण्यासाठी सहा आठवडे वाट पाहण्यापेक्षा ते पुढे आणून भारतीय रिफायनरींमध्ये उतरवता येईल. त्यामुळे तेलटंचाईची भीती कमी होईल, किंमतीतील वाढीचा दबाव कमी होईल आणि बाजारातील चिंता कमी करण्यास मदत होईल.’ तथापि, रशियाबाबत अमेरिकेचे धोरण अजिबात बदललेले नाही आणि भारतालाही याची पूर्ण जाणीव आहे, असे राइट यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या अर्थ विभागाने भारतीय रिफायनरींना रशियन तेल खरेदी करण्यासाठी दिलेल्या ३० दिवसांच्या सवलतीमुळे रशियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अलग ठेवण्याच्या उद्दिष्टावर परिणाम होतो का, या प्रश्नावर राइट म्हणाले की, “अजिबात नाही. हा फक्त अल्पकालीन आणि व्यावहारिक प्रयत्न आहे.”

दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील अमेरिकेचे राजदूत माइक वॉल्ट्झ यांनीही या निर्णयाचे समर्थन करताना तो तात्पुरता आणि व्यवहार्य उपाय असल्याचे सांगितले. हे फक्त ३० दिवसांचे अंतर आहे, ज्यामुळे जहाजांवर साठून असलेले लाखो पिंप तेल भारतीय तेल शुद्धीकरण कारखान्यात पाठवता येईल. ते पुढे म्हणाले की, “शेवटी हा तात्पुरता प्रश्न आहे. दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता, इराणला जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर दबाव टाकण्याची क्षमता कमी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.” ट्रम्प प्रशासन रशियाला मदत करत असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

गेल्या आठवड्यात अमेरिकेने पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यावर ताण येऊ नये म्हणून समुद्रात आधीच असलेल्या रशियन तेलाची भारताला खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Nepal Floods : 'मदत नाही, नुकसानभरपाई हवी'; महाप्रलयानंतर नेपाळची भारत, चीनसह अमेरिकेकडे मागणी

गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना गुड न्यूज! मुंबई-सावंतवाडी नवी एक्सप्रेस उद्यापासून धावणार; गाडीचे वेळापत्रक पाहा

Mumbai : व्हीआयपी गाडीला वाट देण्यासाठी मजुराची सायकलच उचलून फेकली; पोलिसाचा संतापजनक Video व्हायरल

पत्नीने BSF उपनिरीक्षक पतीला दुसऱ्या महिलेसोबत रंगेहाथ पकडलं; पोलिसांना घेऊन थेट हॉटेल गाठलं अन्..., Video

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी CBI चौकशीचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय