राष्ट्रीय

...तर आमच्या देशातून तुम्हाला बाहेर काढू; भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिका सरकारचा इशारा

भारतातील अमेरिकन दूतावासाने बुधवारी भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन नियमांबाबत कडक इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि देशाबाहेर हकालपट्टीही होऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारत-अमेरिका संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद आता थेट विद्यार्थ्यांवरही उमटताना दिसत आहेत. भारतातील अमेरिकन दूतावासाने बुधवारी भारतीय विद्यार्थ्यांसाठी इमिग्रेशन नियमांबाबत कडक इशारा दिला आहे. अमेरिकन कायद्यांचे उल्लंघन केल्यास विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो आणि देशाबाहेर हकालपट्टीही होऊ शकते, असे दूतावासाने स्पष्ट केले आहे.

अमेरिकन दूतावासाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले आहे की, अमेरिकेचे कायदे मोडल्यास तुमच्या विद्यार्थी व्हिसावर गंभीर परिणाम होऊ शकतात. तुम्हाला अटक झाली किंवा कोणताही कायदा मोडला, तर तुमचा व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. तुम्हाला देशातून बाहेर काढले जाऊ शकते आणि भविष्यात अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास अपात्र ठरवले जाऊ शकते. नियमांचे पालन करा आणि तुमचा शैक्षणिक प्रवास धोक्यात घालू नका. अमेरिकन व्हिसा हा अधिकार नाही, तर एक सुविधा आहे, असे अमेरिकेने म्हटले आहे.

चिंता वाढली

या स्पष्ट शब्दांमुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या किंवा आधीच तेथे असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंता वाढली आहे. अमेरिकेने यापूर्वीही भारतातून जाणाऱ्या अवैध स्थलांतरितांबाबत कठोर इशारे दिले आहेत. इमिग्रेशन कायदे मोडल्यास मोठ्या फौजदारी शिक्षेला सामोरे जावे लागू शकते, असे अमेरिकेने स्पष्ट केले होते. अमेरिकी प्रशासन सध्या अवैध स्थलांतर, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग आणि इमिग्रेशन नियमांचे उल्लंघन यासंबंधी प्रकरणांत व्हिसा रद्द करणे आणि देशाबाहेर काढणे अशा कठोर कारवाया करत आहे.

एच-१बी व्हिसा

अमेरिकन प्रशासन सध्या एच-१बी आणि विद्यार्थी व्हिसा नियम अधिक कडक करत आहे. याचा थेट परिणाम परदेशी, विशेषतः भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर दिसून येत आहे. आकडेवारीनुसार गेल्या वर्षी अमेरिकेतील नवीन आंतरराष्ट्रीय प्रवेशांमध्ये १७ टक्क्यांची घट झाली. ऑगस्ट २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या आगमनात वर्षागणिक १९ टक्के घट नोंदवण्यात आली. ही घट २०२१ नंतरची सर्वात मोठी मानली जात आहे.

ठाण्यात खळबळ! ठाकरेंच्या नेत्याची निर्घृण हत्या; दोन संशयित ताब्यात, कुटुंबीयांकडून गंभीर आरोप

LPG Cylinder New Rules : १ ऑक्टोबरपासून बदलणार सिलिंडरचे 'हे' ५ नियम; बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

"शिकवायला येतात की Instagram ID मागायला?" वर्गात मोबाईलवर गेम खेळणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनीचे गंभीर आरोप, VIDEO

कल्याण : RTO च्या तीन एकर जागेवर अतिक्रमण; रस्त्यावर ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची वेळ, तात्पुरती व्यवस्था करण्याचे आवाहन