राष्ट्रीय

अमेरिकेच्या FDI चा इशारा; 'या' भारतीय कंपनीच्या भांड्यात अन्न शिजवत असाल तर सावधान! विषारी अन्न जातंय तुमच्या पोटात?

आपल्या घरात स्वयंपाक करताना आपण वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचा वापर करतो. स्वयंपाकघर सजवण्यासाठीही आपण नवनवीन भांडी घेतो. मात्र, दिसायला आकर्षक असलेली काही भांडी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कारण अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (USFDA) भारतातील सरस्वती स्ट्रिप्स प्रा. लि. या कंपनीच्या भांड्यांबाबत गंभीर इशारा दिला आहे.

नेहा जाधव - तांबे

आपल्या घरात स्वयंपाक करताना आपण वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांचा वापर करतो. स्वयंपाकघर सजवण्यासाठीही आपण नवनवीन भांडी घेतो. मात्र, दिसायला आकर्षक असलेली काही भांडी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. कारण अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने (USFDA) भारतातील सरस्वती स्ट्रिप्स प्रा. लि. या कंपनीच्या भांड्यांबाबत गंभीर इशारा दिला आहे. या भांड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घातक शिसे असल्याचे उघडकीस आले आहे, जे आपल्या आरोग्यासाठी विषारी ठरू शकते.

ही कंपनी 'टायगर व्हाईट' ब्रँड नावाने प्युअर ॲल्युमिनियम म्हणून भांडी विकते. परंतु, या भांड्यात शिसे, पितळ आणि इतर मिश्रधातू असल्याचे आढळून आले आहे. USFDA ने केलेल्या चाचणीत या भांड्यातील अन्नात शिसे मिसळत असल्याचे समोर आले. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे अमेरिकेच्या आरोग्य नियामकाने स्पष्ट केले आहे. यामुळे होणारे आरोग्यविषयक नुकसान लक्षात घेत अमेरिकन एजन्सीने किरकोळ विक्रेत्यांना आणि ग्राहकांना या भांड्यांची विक्री तात्काळ बंद करण्याचे आवाहन केले आहे.

शिसे शरीरात गेल्याने काय नुकसान होते?

शिसे हा एक अत्यंत विषारी धातू आहे. शिसे असलेल्या भांड्यात अन्न शिजवले, की त्या भांड्यातील शिसे अन्नाद्वारे शरीरात जाते. यामुळे लहान मुलं, गर्भवती महिलांना आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना जास्त धोका असतो. त्याचा लहान मुलांच्या आणि अर्भकाच्या मेंदूच्या विकासावर विपरीत परिणाम होतो. ज्यामुळे पुढे त्यांना शिकण्यात अडचणी, बुद्ध्यांक घटणे, वर्तनातील बदल अशी लक्षणे दिसू शकतात. प्रौढांमध्ये शिस्याच्या प्रभावाने थकवा, डोकेदुखी, पोटदुखी, उलट्या आणि मज्जासंस्थेचे विकार उद्भवू शकतात.

ग्राहकांनी कोणती काळजी घ्यावी?

  • घरात टायगर व्हाईट किंवा अशा प्रकारच्या धातूच्या भांड्यांचा वापर तात्काळ थांबवावा.

  • जुन्या किंवा नूतनीकरण केलेल्या भांड्यांचा वापर टाळावा.

  • सुरक्षित ब्रँड्सचीच भांडी वापरावी आणि विक्रेत्याकडून त्या भांड्याची सुरक्षितता तपासून घेणे आवश्यक आहे.

आपल्या आरोग्यासाठी भांडी घेतानाही आता दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

अमरावतीत मोठी कारवाई! लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयाजच्या घरावर बुलडोझर; अनधिकृत बांधकाम पाडले, VIDEO

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

चहाच्या टपरीवर रेल्वे कर्मचारी कोसळला; ३ मिनिटे तडफडल्यानंतर मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी

Mumbai : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मुंबादेवी मंदिरात आंबा महोत्सव; भक्तांसाठी खास सोहळा