राष्ट्रीय

Uttarakhand : देवदर्शनाहून परतणाऱ्या बसला भीषण अपघात ; बस खोल दरीत कोसळल्याने ७ जणांचा मृत्यू

उत्तर काशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ हा अपघात झाला असून या बसमध्ये ३५ भाविक प्रवास करत होते.

नवशक्ती Web Desk

उत्तराखंडच्या उत्तर काशीमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. उत्तर काशीतील गंगोत्री राष्ट्रीय महामार्गावर गंगनानीजवळ एक प्रवासी बस दरीत कोळल्याने जालेल्या अपघातात सात प्रवासी मरण पावले आहेत. या बसमध्ये ३५ प्रवासी प्रवास करत होते. २8 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी हे गुजरातमधील होते. गंगोत्रीहून प्रवास करुन परतीच्या वाटेवर असताना या बसचा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तात्काळ हालचाली सुरु करत पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं असून बचावकार्य सुरु आहे. एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने प्रवाशांना बाहेर काढलं आहे.

या अपघातात ७ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर २8 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गंगनानीजवळ आज दुपारी ३ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी अपघात ग्रस्तांना त्वरीत मदत देण्याचे, बचावकार्य करण्याचे तसंच जखमींच्या उपचाराची योग्य व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

दिल्लीकडे डोळे; तीन दिवसांनंतरही महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना, शिंदे गटाचे जोरदार दबावतंत्र

राज्यात हुडहुडी वाढणार! पारा २ ते ३ अंशांनी आणखी खाली येणार

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग

लिलाव संपला, आता उत्सुकता १४ मार्चची

महाविकास आघाडीचे आता ‘मिशन ईव्हीएम’