ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'  
राष्ट्रीय

ज्येष्ठ तमिळ साहित्यिक वैरामुथू यांना 'ज्ञानपीठ'

सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Swapnil S

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध तमिळ कवी, गीतकार आणि लेखक आर. वैरामुथू यांना २०२५ चा साहित्यातील सर्वोच्च सन्मान असलेला ६० वा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. तमिळ साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्ञानपीठ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

वैरामुथू यांची ३७ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यामध्ये कवितासंग्रह, कादंबरी आणि अन्य साहित्य प्रकारांचा समावेश आहे. आपल्या जवळपास ४० हून अधिक वर्षांच्या कारकीर्दीत वैरामुथू यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्यांना सात वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानेही (सर्वश्रेष्ठ गीतकार) सन्मानित करण्यात आले आहे.

प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ज्ञानपीठ निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. समितीमधअये माधव कौशिक, दामोदर मौझो, सुरंजन दास, ए. कृष्णा राव, प्रफुल्ल शिलेदार, केशुभाई देसाई, जानकी प्रसाद शर्मा, के. - श्रीनिवास राव आणि महेश्वर यांचा समावेश आहे.

Mumbai : उद्या मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री जम्बो ब्लॉक, कोणत्या लोकल रद्द? जाणून घ्या

Mumbai CJP Protest : अभिनेता इम्रान खान पोलिसांच्या ताब्यात; व्हॅनमधून फोटो शेअर करत म्हणाला...

CJP Protest : आंदोलनाला हिंसक वळण; अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जींसह अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात, Video

CJP Protest : अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; जंतर-मंतरवरील आंदोलनाची धुरा आता अजिंक्य शिंदेंकडे, Video

अभिजीत दिपके यांच्या आजीचं निधन; नातू दिल्लीत पोलिसांच्या ताब्यात, अंत्यसंस्कारासाठी गावी परतण्याची शक्यता