वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांगांसाठी सुधारित सुविधा 
राष्ट्रीय

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिव्यांगांसाठी सुधारित सुविधा

भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमध्ये, विशेषतः मुंबई सेंट्रल-गांधीनगर रेल्वे मार्गावरील गाडीत दिव्यांग प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

कमल मिश्रा

मुंबई : भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांमध्ये, विशेषतः मुंबई सेंट्रल-गांधीनगर रेल्वे मार्गावरील गाडीत दिव्यांग प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये आता दिव्यांग प्रवाशांच्या सुरक्षित, सन्मानजनक आणि आरामदायी प्रवासासाठी अनेक नवे सुधारणा उपाय करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या सुधारणा उपायांमध्ये स्वयंचलित दरवाजे आणि हळुवार उतार असलेली प्रवेशद्वारे यांचा समावेश आहे, ज्यामुळे व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांना सहज चढणे व उतरता येईल. ठराविक डब्यांमध्ये विशेष रॅम्प्स उपलब्ध करून देण्यात आले असून प्रवेशद्वारांवर दिव्यांगजन चिन्ह (लोगो) स्पष्टपणे दर्शवले गेले आहे, ज्यामुळे ओळख सोपी होते.

ब्रेल लिपीत सूचना

प्रवाशांच्या अधिक सुलभतेसाठी ब्रेल लिपीत सूचना ही बसविण्यात आल्या आहेत. या सूचनांमध्ये आसन क्रमांक, डब्यांचे प्रवेशद्वार आणि प्रसाधनगृहांची माहिती दिली असून, त्यामुळे दृष्टिहीन प्रवासी स्वतंत्रपणे प्रवास व्यवस्थापन करू शकतात. ही योजना भारतीय रेल्वेच्या सार्वत्रिक सुलभतेच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

विशेष आसनव्यवस्था

व्हीलचेअर वापरणाऱ्या प्रवाशांसाठी डब्यांच्या आत अधिक जागा असलेली विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.

गौरी गर्जे प्रकरणात मोठा ट्विस्ट; दोघांच्या अंगावर जखमा, अनंत गर्जेच्या पोलिस कोठडीत वाढ

६ महिन्यांचा संसार, कौमार्य चाचणी अन् पतीचे अफेअर; नाशिकमध्ये विवाहितेने संपवलं जीवन

Disha Salian's Death Case : पाच वर्ष उलटले तरी किती वेळ चौकशी करणार? हायकोर्टाने पोलिसांना फटकारले

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार