राष्ट्रीय

आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू! विजय मल्ल्याला हायकोर्टाने सुनावले

कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

Swapnil S

मुंबई : कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला उद्याेगपती विजय मल्ल्या याला उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. मल्ल्याने फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान दिले आहे.

तथापि, त्याच्या याचिकेच्या वैधतेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि ‘आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’, असेही न्यायालयाने फरार विजय मल्ल्याला सुनावले. मल्ल्या भारतात परत कधी येणार हे निश्चित झाल्यानंतरच याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे न्यायालय म्हणाले.

फरार आर्थिक गुन्हेगार (एफईओ) कायद्याच्या अंमलबजावणीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंकड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विजय मल्ल्यातर्फे ॲड. अमित देसाई यांनी बाजू मांडली. मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्तींनी मल्ल्याला उद्देशून “तुम्ही आधी भारतात या, मग आम्ही तुमचे म्हणणे ऐकू’ असे सुनावले.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग