राष्ट्रीय

रेस्टॉरंटमधील वेटर आणि त्याच्या पार्टनरची डिनर डेट; सोशल मीडियावर Video व्हायरल, नेटकरी म्हणाले, "अशी मुलगी...

त्या महिलेला आपल्या पार्टनरसोबत डिनर करायचे असते. मात्र, तो त्यावेळी ड्युटीवर असतो. कामाच्या वेळेत कामाच्याच ठिकाणी पार्टनरसोबत जेवण्यासाठी तो...

किशोरी घायवट-उबाळे

कधी कधी साध्या दिसणाऱ्या गोष्टींमध्येही प्रेमाची उब दडलेली असते. एकत्र बसून जेवण करणे, काय खायचे यावरून झालेले किरकोळ वाद आणि त्यातला एकमेकांचा शांत सहवास… अशा छोट्या क्षणांमुळेच नाती अधिक खास वाटतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला रेस्टॉरंटमधील एक व्हिडिओ याच भावनेचे जिवंत उदाहरण आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय?

इन्स्टाग्रामवरील @chalte_phirte098 या युजरने शेअर केलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये रेस्टॉरंटमधील एक हृदयस्पर्शी प्रसंग दिसतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच व्लॉगर एका महिलेला दाखवत सांगतो की, ती डिनरसाठी रेस्टॉरंटमध्ये बसली आहे, तर तिचा पार्टनर त्याच ठिकाणी वेटर म्हणून काम करत आहे.

त्या महिलेला आपल्या पार्टनरसोबत डिनर करायचे असते. मात्र, तो त्यावेळी ड्युटीवर असतो. कामाच्या वेळेत कामाच्याच ठिकाणी पार्टनरसोबत जेवण्यासाठी तो मालकाकडे परवानगी मागतो. विशेष म्हणजे, मालक त्याला परवानगी देतो. हा क्षण पाहून ती महिला लाजते आणि हसते.

याच दरम्यान, रेस्टॉरंटमधील इतर कर्मचारी त्या वेटरला गंमतीने “भाभीजी आ गयी” असे म्हणत चिडवताना व्हिडिओत दिसतात. वेटरच्या लाजऱ्या-आनंदी चेहऱ्याकडे पाहून प्रेक्षकांच्याही चेहऱ्यावर हसू उमटते. यानंतर वेटर तिच्याकडे येतो. साध्यासोप्या डेटसारखे दोघे गप्पा मारतात, हसतात आणि ऑर्डर देतात. दरम्यान, एक सहकारी वेटर त्यांना पाणी सर्व्ह करतो, ज्यातून त्या रेस्टॉरंटमधील सहकार्याची आणि आपुलकीची संस्कृती दिसून येते.

नेटकर्‍यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट सेक्शन प्रेम, निरागसता आणि आनंदाने भरून गेले. अनेकांनी या नात्यातील साधेपणा आणि एकमेकांप्रती असलेला आदर याचे मनापासून कौतुक केले.

काहींनी “दिल खुश हो गया!” अशी प्रतिक्रिया दिली, तर काहींनी “भाऊने लाइफ जिंकली!” असे म्हटले. एका युजरने तर “बॉलिवूडच्या लव्ह स्टोरींपेक्षा ही कथा कितीतरी जास्त सुंदर आहे,” अशी कमेंट केली.

अनेकांनी सांगितले की, हा छोटासा व्हिडिओ अपेक्षेपेक्षा जास्त भावूक करून गेला. साधेपणातलं प्रेम किती सुंदर असू शकतं, हे दाखवणारा हा व्हिडिओ सध्या लाखो मने जिंकत आहे.

मुंबईत NOTA झाला मोठा! कोणत्या प्रभागात सर्वाधिक वापर, कुठे अत्यल्प प्रतिसाद? बघा टॉप ५ लिस्ट

समुद्राखाली हालचाल! वसईच्या समुद्रात अचानक 'रिंगण'; थोडक्यात वाचली मासेमारीसाठी गेलेली बोट, मच्छिमारांमध्ये भीती, ज्वालामुखीचा संशय

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती