राष्ट्रीय

विशाखापट्टणम स्टील प्लांटमध्ये भीषण अपघात! वितळलेलं लोखंड अंगावर सांडल्याने ८ कामगारांचा मृत्यू, अनेकजण जखमी

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील विजाग स्टील प्लांटमध्ये भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. क्रेनद्वारे वितळलेले लोखंड हलवित असताना ते कामगारांवर सांडल्याने आठ जणांचा मृत्यू झाला.

Mayuri Gawade

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) स्टील प्लांटमध्ये सोमवारी भीषण दुर्घटना घडली. क्रेनच्या साहाय्याने वितळलेले लोखंड वाहून नेत असताना ते कामगारांवर सांडल्याने ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, स्टील प्लांटमध्ये क्रेनच्या मदतीने एका मोठ्या पात्रातून वितळलेले लोखंड हलविण्याचे काम सुरू होते. यावेळी अचानक लोखंड सांडल्याने जवळ काम करणारे कामगार त्याच्या विळख्यात सापडले. पोलिसांच्या माहितीनुसार, सांडलेले लोखंड सुमारे १,६०० अंश सेल्सिअस तापमानाचे होते. त्यामुळे दुर्घटनेची तीव्रता अधिक वाढली.

मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून मदतकार्य वेगाने राबवावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

चौकशी सुरू

दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणा घटनेची चौकशी करत आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Gwalior Accident : नवरात्रीत शीतला माता मंदिराबाहेर भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने भाविकांना चिरडलं; १४ जणांचा मृत्यू

Mumbai Crime: आई-वडील झोपेत असताना CSMT स्थानकातून चिमुकलीचं अपहरण; संशयित महिला CCTV मध्ये कैद

घटनादुरुस्ती विधेयकावर घाईने निर्णय नको; खर्गे यांचे पंतप्रधानांना पत्र, सीमांकन प्रस्तावांवर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचीही मागणी

५ हजारांचे मूल्य कसे समजणार? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

Mumbai : पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय; दुर्गामूर्तीचे फोटो, व्हिडीओ काढण्यास मनाई