संग्रहित छायाचित्र एक्स @narendramodi
राष्ट्रीय

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार, पंतप्रधान मोदींचे आमंत्रण स्वीकारले

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरूवारी सांगितले.

Krantee V. Kale

रशिया आणि भारत आपले द्विपक्षीय संबंध ऐतिहासिक सर्वोच्च पातळीवर नेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच उद्देशाने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी गुरूवारी सांगितले. "अध्यक्षांच्या दौऱ्याची तयारी सुरू आहे," असेही त्यांनी स्पष्ट केले.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून पुतीन भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. भारताच्या पंतप्रधानांनी दिलेले आमंत्रण रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी स्वीकारले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर मोदींनी सर्वप्रथम रशियाचा विदेशी दौरा केला होता. आता आमची वेळ आहे.", असे लाव्हरोव्ह म्हणाले. "सध्या रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा नियोजनाच्या टप्प्यात आहे", असेही त्यांनी सांगितले. रशियन न्यूज एजन्सी TASS ने याबाबत वृत्त दिले आहे.

पुतीन यांचा भारत दौरा कधी?

"रशिया आणि भारत : नवीन द्विपक्षीय अजेंड्याकडे वाटचाल" या परिषदेला व्हिडिओद्वारे संबोधित करताना लाव्हरोव्ह बोलत होते. ही परिषद रशियामधील भारतीय दूतावास आणि रशियन इंटरनॅशनल अफेयर्स कौन्सिल (RIAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. मात्र, हा दौरा नेमका कोणत्या महिन्यात किंवा तारखेला होणार आहे, याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

फेब्रुवारी २०२२ मध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून अध्यक्ष पुतीन यांचा भारतातील हा पहिलाच दौरा असणार आहे.

Putin India Visit : पुतिन मॉस्कोहून रवाना; संध्याकाळी ६.३५ ला पोहोचणार दिल्लीत, मोदींसोबत खास डिनर; बघा संपूर्ण वेळापत्रक

भारत-रशिया करार : रशियन लष्करी तळ भारताला वापरता येणार

मुंबईकरांनो सावधान! अरबी समुद्र खवळणार, उंच लाटा उसळणार; आजपासून ३ दिवस मोठी भरती; किनारी जाणे टाळा - BMC चे आवाहन

'बोलो जुबां केसरी'...नववधूची स्टेजवरून शाहरूख खानकडे अनोखी डिमांड; नेटकरी घेतायेत मजा - बघा Video

मरीन ड्राइव्ह ते ऑरेंज गेट भुयारी मार्ग: प्रकल्पाचा शानदार शुभारंभ; मेट्रो-३ मार्ग, पश्चिम-मध्य रेल्वे आणि ७०० हेरिटेज इमारतींखालून जाणार रस्ता