(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
राष्ट्रीय

भूपतीनगर हल्ला प्रकरण : पश्चिम बंगाल पोलिसांचे ‘एनआयए’ अधिकाऱ्याला चौकशीसाठी समन्स

Swapnil S

कोलकाता : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पूर्व मेदिनापूर जिल्ह्यात छापा टाकला असता त्यांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात जखमी झालेल्या ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याला पश्चिम बंगाल पोलिसांनी मंगळवारी समन्स बजावले असून त्यांना ११ एप्रिल रोजी भूपतीनगर पोलीस ठाण्यात तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

या हल्ल्यात एका वाहनाची मोडतोड करण्यात आली, ते वाहनही घेऊन येण्यास तपास अधिकाऱ्याने सांगितले आहे. या वाहनाची न्यायवैद्यक तपासणी करावयाची असल्याचेही तपास अधिकाऱ्याने म्हटले आहे. त्याचप्रमाणे ‘एनआयए’ अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्याने तीन ग्रामस्थांनाही चौकशीसाठी पाचारण केले असून त्यांना दोन ते तीन दिवसांत हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. भूपतीनगर येथे २०२२ मध्ये स्फोट झाला होता. त्यातील दोन मुख्य सूत्रधारांना अटक करण्यासाठी ‘एनआयए’ पथक गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला होता.

एफआयआर रद्द करण्यासाठी ‘एनआयए’ची हायकोर्टात धाव

पश्चिम बंगालच्या भूपतीनगर येथे छापा टाकण्यासाठी गेलेल्या ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदविण्यात आलेला एफआयआर रद्द करावा, अशी मागणी करणारी याचिका ‘एनआयए’ने मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयात दाखल केली आहे. न्या. जय सेनगुप्ता यांनी ही याचिका दाखल करून घेतली आहे. राज्य पोलिसांनी ‘एनआयए’ अधिकाऱ्यांविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नये यासाठी अंतरिम संरक्षण द्यावे, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल