पश्चिम बंगालमध्ये १५ केंद्रांवर आज फेरमतदान (संग्रहित फोटो)
राष्ट्रीय

पश्चिम बंगालमध्ये १५ केंद्रांवर आज फेरमतदान

पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर २ मे रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर २ मे रोजी फेरमतदान घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाने शुक्रवारी दिले आहेत.

या केंद्रांवर २९ एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते.

फेरमतदानाची वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ अशी असून १५ पैकी ११ मतदान केंद्रे 'मगरहाट पश्चिम' विधानसभा मतदारसंघात आहेत, तर ४ मतदान केंद्रे 'डायमंड हार्बर' मतदारसंघात येतात.

राज्य निवडणूक यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Monsoon Update : मान्सूनचा काढता पाय; राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू, हवामान खात्याची माहिती

लातूर बँकेच्या संचालकांना हटवण्याचे RBI चे आदेश

Mumbai : दादरमधील सीकेपी हॉलचा १२ ऑक्टोबरला लिलाव

पक्षचिन्हाच्या वादाबाबत ममता बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात

टॅरिफ विधेयकावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी