हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचा थरार; वाराणसीत 'विंग्ज ओव्हर गंगा'ला मोदींची उपस्थिती 
राष्ट्रीय

हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांचा थरार; वाराणसीत 'विंग्ज ओव्हर गंगा'ला मोदींची उपस्थिती

भारतीय हवाई दलाच्या ‘विंग्ज ओव्हर गंगा’ या हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. वाराणसीत ‘नमो घाट’ येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हवाई दलाच्या प्रमुख प्रात्यक्षिक पथकांनी गंगेच्या आकाशात विविध हवाई कसरती सादर केल्या. लढाऊ विमानांच्या गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

Swapnil S

वाराणसी : भारतीय हवाई दलाच्या ‘विंग्ज ओव्हर गंगा’ या हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. वाराणसीत ‘नमो घाट’ येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात हवाई दलाच्या प्रमुख प्रात्यक्षिक पथकांनी गंगेच्या आकाशात विविध हवाई कसरती सादर केल्या. लढाऊ विमानांच्या गर्जनेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदी यांच्यासमवेत या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय हवाई प्रात्यक्षिकांचा रविवारी अखेरचा दिवस होता.

‘सूर्यकिरण’ या हवाई कसरत पथकाने अचूक उड्डाणे आणि समन्वयाने केलेल्या विविध कसरती सादर केल्या. तर ‘सारंग’ हेलिकॉप्टर प्रात्यक्षिक पथकाने आकाशातील चित्तथरारक कसरतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

पंतप्रधानांच्या स्वागतासाठी नागरिकांची गर्दी

पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीमुळे वाराणसीतील नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोलीस लाइन्सपासून नमो घाटापर्यंतच्या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.

‘सारंग’ हेलिकॉप्टर पथकाने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

‘ओंकार फॉर्मेशन’ दरम्यान एमआय-१७ या हेलिकॉप्टरमधून राष्ट्रीय ध्वज घेऊन आकाशात उड्डाण करण्यात आले. राफेल, सुखोई, मिराज-२०००, तेजस, मिग-२९ आणि जग्वार या लढाऊ विमानांसह वाहतूक विमाने व हेलिकॉप्टरनी भारतीय हवाई दलाच्या कार्यक्षमतेचे आणि सामर्थ्याचे दर्शन घडवले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...

Navi Mumbai : 'नैना'त १५ लाख रोजगार निर्मिती; भूमिपुत्रांना प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवाळीत सुंदर दिसायचंय? आजपासूनच सुरू करा ३ गोष्टी; चेहरा, केस आणि फिटनेससाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितला सोपा मार्ग