(संग्रहित छायाचित्र) 
नवी मुंबई

पनवेलमधील बैलगाडा शर्यतीत एक तरुण गंभीर जखमी; आयोजकावर गुन्हा दाखल

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात प्रतिबंधात्मक आदेश लागू असताना, पनवेलच्या नेरे भागात बेकायदेशीररीत्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीतील बैल एका तरुणाच्या अंगावर गेल्याने तो यामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पनवेल तालुका पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजक सुरज पाटील व बैलगाडाचालक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या बैलगाडा शर्यतीत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असताना, पनवेलच्या नेरे भागात राहणाऱ्या सुरज पाटीलने गत १९ मे रोजी कुणाचीही परवानगी न घेता बेकायदेशीररीत्या नेरे भागात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. सदर बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी अंबरनाथ येथून ओलला जयेश जयराम जाधव (१८) या तरुणाच्या अंगावर बैलगाडा शर्यतीतील एक बैल गेल्याने जयेशच्या डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमी जयेश जाधव हा बोलण्याच्या स्थितीत नसल्याने हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पनवेलच्या नेरे भागात बैलगाडा शर्यत भरवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे बैलगाडा शर्यतीला देण्यात आलेल्या परवानगीबाबत चौकशी केली असता, आयोजकांनी पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची देखील परवानगी घेतली नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या सुरज पाटीलने नियमांचे उल्लंघन करून, विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे आढळून आले.

सुरज पाटीलने सदर बेकायदेशीररित्या विनापरवानगी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून गंभीर जखमी झालेल्या तरुणाची व इतरांची सुरक्षितता धोक्यात आणल्याने पनवेल तालुका पोलिसांनी आयोजक सुरज पाटील व बैलगाडाचालकविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त