नवी मुंबई

नाताळच्या दिवशीच चर्चला आग

बुधवारी ऐन नाताळ सणाच्या दिवशीच कोपरखैरणे येथील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये आगीची घटना घडली.

Swapnil S

नवी मुंबई : बुधवारी ऐन नाताळ सणाच्या दिवशीच कोपरखैरणे येथील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये आगीची घटना घडली. आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सणाची केलेली सजावट आणि चर्च बाहेर पार्क केलेली एक दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडली. अग्निशमन दल वेळेवर आल्याने आग पसरली नाही. तसेच पहिल्या मजल्यावर अडकलेल्या भाविकांना सोडवता आले.

कोपरखैरणे सेक्टर ११ येथील सेंट फ्रान्सिस चर्चमध्ये प्रार्थना आणि नाताळ सण साजरा करण्यास अनेक भाविक आले होते. मात्र दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या सुमारास तळ मजल्यावरील सजावट केलेल्या स्टेजला आग लागली. सजावट मोठ्या प्रमाणात असल्याने आग लगेच पसरली. आगीच्या ज्वालांनी चर्च बाहेर पार्क केलेली एक दुचाकी जळून खाक झाली. सुमारे एक ते सव्वा तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

कुंभमेळ्यासाठी पूर्वपरवानगीशिवाय झाडे तोडायला बंदी; मुंबई उच्च न्यायालयाचा सज्जड दम

‘व्हीबी-जी राम जी’ विधेयक गदारोळात मंजूर; विरोधकांनी विधेयकाची प्रत फाडली

कोकाटेंच्या वाटेत काटे

‘जेन झी’ने आणखी एक सरकार उलथवले

आजचे राशिभविष्य, १९ डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत