नवी मुंबई

CIDCOकडून नवी मुंबईकरांना दिलासा! मेट्रोच्या भाड्यामध्ये ३३ टक्के कपात; उद्यापासून नवे दर होणार लागू

नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, यासाठी सिडकोने नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये कपात केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा, यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये कपात केली आहे. सिडको महामंडळातर्फे, बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या तिकीटांमध्ये ३३% पर्यंत लक्षणीय कपात करण्यात आली असून सातपासून नवी मुंबई मेट्रो सेवेकरिता सुधारित तिकीट दर लागू होणार आहेत. सुधारित दरानुसार तिकीटाचा किमान दर १० रुपये व कमाल ३० रुपये असणार आहे.

जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या नवी मुंबई मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा यासाठी सिडकोने बेलापूर ते पेंधर या नवी मुंबई मेट्रोचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्याकरिता मेट्रोच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. सुधारित दरांनुसार पहिल्या ० ते २ किमी आणि २ ते ४ किमीकरिता रु. १०, पुढील ४ ते ६ किमी आणि ६ ते ८ किमी करिता रु. २० आणि ८ ते १० किमीच्या टप्प्यासह त्या पुढील अंतराकरिता रु. ३०, असे तिकीट दर लागू होणार आहेत. यापूर्वी, बेलापूर टर्मिनल ते पेंधर टप्प्याकरिता तिकीटाचा दर रु. ४० इतका होता. हा तिकीट दर आता रु. ३० असणार आहे.

सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अंतर्गत मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर विकसित करण्यात आला आहे. या मार्गामुळे सीबीडी, तळोजा एमआयडीसी आणि सिडकोच्या खारघर येथील गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. या मार्गावर १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवा सुरू झाली असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मेट्रो सेवेला लाभला आहे.

जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय असणाऱ्या मेट्रोचा लाभ अधिकाधिक प्रवाशांना घेता यावा याकरिता तिकीट दरांमध्ये कपात करण्यात आली आहे. सुधारित तिकीट दरांमुळे जवळच्या तसेच लांबच्या अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही फायदा होणार आहे. यापुढेही नवी मुंबईकरांनी मेट्रो सेवेला असाच उत्तम प्रतिसाद देत राहावा आणि या सेवेचा लाभ घ्यावा. - विजय सिंघल (उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको)

...म्हणून कौटुंबिक पेन्शनला नकार नाही; महाराष्ट्र नागरी सेवेच्या तरतुदीमध्ये नमूद - न्यायालय

'लाडक्या बहिणी' चिंताग्रस्त! e-KYC करताना अनेक अडचणी; OTP न येणे, पोर्टल बंदच्या वाढत्या तक्रारी; योजनेतून बाद होण्याची भीती

राज्यात आता इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे; चंद्रपूर, गडचिरोलीला मान; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये परीक्षा लांबणीवर; शासकीय रेखाकला परीक्षा आता १ ते ५ ऑक्टोबरदरम्यान; स्वतंत्र वेळापत्रक जाहीर

पावसाला सुट्टी नाहीच! रविवारचा दिवस पावसाने गाजवला; मुंबई शहर, उपनगरात धुवांधार कायम