नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० डिसेंबरपासून सखोल स्वच्छता मोहिमा राबविण्यास सुरुवात झाली असून शनिवार व रविवार या सुट्ट्यांच्या दिवशीही प्रभावीपणे मोहिमा राबविण्यात आल्या.
या अंतर्गत दिघा विभागामध्ये एमआयडीसी रोडवर बिस्कीट गल्ली हजेरी शेडपर्यंत साफसफाई करण्यात आली. तसेच ऐरोली विभागातही दिवा सर्कल ते टी जंक्शनपर्यंत सखोल स्वच्छता करण्यात आली. यावेळी रस्ते, पदपथ, दुभाजक यांच्याकडेला साठलेली माती ब्रश, झाडू आणि फ्लीपर मशीनद्वारे साफ करण्यात आली. तसेच स्प्रेईंग मशीनद्वारे रस्ते, पदपथ, दुभाजकांची त्याचप्रमाणे रस्त्यांवरील पादचारी पूल, शिल्पाकृती, बस स्टॉप यांचीही सखोल साफसफाई करण्यात आली. कोपरखैरणे विभाग कार्यालय परिसरात तसेच इतरही विभाग कार्यालय क्षेत्रात ही मोहीम राबवण्यात आली.