नवी मुंबई

एनएमएमटी बससेवा पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी कम्युनिस्ट पक्षाचे धरणे

Swapnil S

उरण : नवी महानगरपालिकेच्या परिवहन सेवेने कोणतीही पूर्व सूचना न देता उरणकरांच्या नवी मुंबईसाठी प्रवासाची जीवन रेखा ठरलेली एनएमएमटी बस सेवा व्यवस्थापनाने बंद केली आहे. ही सेवा पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उरण चारफाटा येथे धरणे आंदोलन केले. त्याचप्रमाणे खोपटे बस अपघातातील मयत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

अपघातानंतर कामगारांची सुरक्षा आणि तोट्यात चालणारा मार्ग ठरवून एनएमएमटी ची उरणमधील बससेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. याचा फटका उरणच्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे प्रवाशांना आपलं निश्चित ठिकाण गाठण्यासाठी पुन्हा एकदा धोकादायक खासगी वाहतुकीचा आसरा घ्यावा लागला आहे. परिणामी वेळ आणि अधिकच्या खर्चाची भार आता उरणकरांच्या खिशावर पडत आहे.

उरण ते नवी मुंबई दरम्यानच्या महानगरपालिके या ३१ व ३० क्रमांकाच्या मार्गावरील एनएएमटीची बससेवा सुरू होती. ती पूर्ण बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. एनएमएमटी बसने दररोज प्रवास करणाऱ्या चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यवसायिक यांनी पर्यायी मार्ग ठरवून आपला प्रवास सुरू केला आहे. यासाठी पर्याय म्हणून, लोकल, रिक्षा तसेच खासगी इको वाहनांतून प्रवास केला. या धरण्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सीआयटीयु, जनवादी महिला संघटना, डीआयएफआय या विविध संघटनानी हे आंदोलन केले. या धरण्याचे नेतृत्व माकपचे जिल्हा सचिव कॉ. रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, हेमलता पाटील, राकेश म्हात्रे यांनी केले.

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे