नवी मुंबई

अश्लील फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा

मैत्रिणीने संबंध तोडल्याचा राग मनात ठेवत मैत्रिणीची मुलगी आणि मैत्रिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.

Swapnil S

नवी मुंबई : मैत्रिणीने संबंध तोडल्याचा राग मनात ठेवत मैत्रिणीची मुलगी आणि मैत्रिणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. सदर फोटो हे बनावट असल्याचा प्रकार समोर आल्यावर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तोहिक आलम असे आरोपीचे नाव आहे. तोहिकची एका महिलेसोबत ओळख झाली होती, या ओळखीचा फायदा घेत २ वर्षांपूर्वी त्याने एका लॉजमध्ये गोड बोलून तिच्यावर बलात्कार करून त्याचे चित्रीकरण केले. काही महिन्यांनंतर त्या चित्रीकरणाची भीती दाखवून त्याने वारंवार अत्याचार केला.

या घटनेला कंटाळून मैत्रिणीने आरोपीशी संबंध तोडले. मैत्रिणीने संबंध तोडल्याचा राग मनात ठेवत आरोपीने मैत्रिणीची मुलगी आणि मैत्रिणीचे फोटो मॉर्फ करून त्याला अश्लील स्वरूप दिले आणि हे सर्व फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केले. ही बाब लक्षात येताच पीडित महिलेने याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

विरोधक म्हणजे 'नाराज फुफा'; प्रगती झाली तरी तक्रारी चालूच, मोदींचा हल्लाबोल; डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोरचे उद्घाटन

नेपाळमधील प्रलय ही तर २०५० ची नांदी

राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे !

आजचे राशिभविष्य, ९ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सकाळची सुरुवातच चुकीची होतेय? किडनीवर परिणाम करणाऱ्या 'या' सवयी जाणून घ्या