नवी मुंबई

शिंदेंच्या विरोधातील लढाईसाठी स्वगृही परत या; गणेश नाईकांना संजय राऊतांचे आवाहन; म्हणाले - "भाजपमध्ये राहून...

नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी गणेश नाईक यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे आवाहन केले. माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे. त्यांना शिंदे प्रवृत्तीशी...

Swapnil S

भाजपमध्ये राहून वनमंत्री गणेश नाईक यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रवृत्तीविरोधात लढता येणार नाही. भाजपसोबत राहून ही लढाई शेवटाला जाऊ शकत नाही. त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही अर्थात शिवसेनेत परतावे आणि लढाईचे रणशिंग फुंकावे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. शिवसेनेत येऊन ही लढत दिली तर तुमचाच विजय आहे, असेही राऊत म्हणाले.

नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी गणेश नाईक यांना शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचे आवाहन केले. माझा गणेश नाईक यांना प्रेमाचा सल्ला आहे. त्यांना शिंदे प्रवृत्तीशी भाजपमध्ये राहून लढता येणार नाही. कारण या प्रवृत्तीला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांचा छुपा पाठिंबा आहे. नाईक यांनी त्यांच्याच जिल्ह्यात भ्रष्टाचार आणि अरेरावीविरोधात रणशिंग फुंकले आहे. नवी मुंबई आणि ठाण्यातील रस्ते आणि उद्यानासाठी राखीव असलेले भूखंड बिल्डरांच्या घशात घातले गेले. त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. हा भ्रष्टाचार असाच सुरू राहिला तर एक दिवस एकनाथ शिंदे यांना तुरुंगात जावे लागेल हे स्वत: नाईक सांगत आहेत, असे राऊत म्हणाले.

शिंदे विरोधातील या लढाईला गणेश नाईक यांना सरकारचे पाठबळ मिळत नाही. त्यामुळे सत्तेत राहून त्यांना ही लढाई लढता येणार नाही. त्यांच्या हातापायात बेड्या टाकून त्यांना लढायला पाठवलेले आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत स्वगृही आणि मूळ प्रवाहात येऊन तेथून लढाई लढली पाहिजे. त्यासाठी संपूर्ण जिल्हा तुमच्या पाठिशी उभा राहील, अशी ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली. भाजपमध्ये राहून लढताना फारतर तुम्हाला आमदारकी आणि मंत्रिपदे मिळतील. पण लढण्याचे बळ कधीच मिळणार नाही, असा सल्लाही संजय राऊत यांनी नाईक यांना दिला आहे.

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग