(Photo - FPJ) 
नवी मुंबई

Navi Mumbai : मैत्रिणीच्या आईने केलेला अपमान जिव्हारी लागला, दहावीच्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन, २ महिलांवर गुन्हा दाखल

घनसोली परिसरात एका १५ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीच्या आईने आणि शेजारणीने केलेल्या अपमानामुळे आणि मारहाणीतून व्यथित होऊन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी दोन्ही महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेहा जाधव - तांबे

नवी मुंबई येथील घनसोली परिसरात एका १५ वर्षीय दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मैत्रिणीच्या आईने आणि शेजारणीने केलेल्या अपमानामुळे आणि मारहाणीतून व्यथित होऊन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी दोन्ही महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शमिका नागेश गावडे (वय १५) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती आपल्या आई-वडिलांसोबत तळवळी, घनसोली येथे राहत होती. ती खासगी ट्युशनमधून दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत होती.

किरकोळ वादातून अपमान

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. १५) सायंकाळी क्लासमध्ये शमिकाचे मैत्रिणीसोबत भांडण झाले. पण, समजुतीने हा वाद लगेच मिटला. क्लास संपल्यानंतर सगळे घरी गेले. पण, त्या विद्यार्थिनीने घरी जाऊन आईला याबद्दल सांगितलं. यानंतर विद्यार्थिनीची आई रेश्मा संतोष गवांदे (वय ४२) हिने शमिकाला आपल्या घरी बोलावलं. तिथे रेश्मा आणि तिची शेजारीण मयुरी सोमनाथ नाईकवडी (वय ४०) यांनी तिला कठोर शब्दांत सुनावलं, तिचा अपमान केला आणि तिच्या पालकांबद्दलही अवमानकारक शब्द वापरले. इतकंच नव्हे, तर रेश्माने शमिकाला चापट मारल्याचेही समोर आले आहे.

अपमान आणि मारहाणीमुळे व्यथित झालेली शमिका घरी परतली. ती प्रचंड तणावाखाली गेली आणि काही वेळानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री तिची आई घरी परतली असता शमिका बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने एरोली महानगरपालिका रुग्णालयात नेण्यात आलं; मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केलं.

सुसाइड नोटमध्ये कारण

शमिकाच्या घरातून दोन पानी आत्महत्यापत्र सापडलं. त्यात तिने संपूर्ण घटनेचं वर्णन केलं असून पालकांची माफीही मागितली आहे. या पत्रातून तिला झालेला अपमान आणि मानसिक वेदना तिने लिहिल्या. या घटनेनंतर रबळे पोलिसांनी रेश्मा संतोष गवांदे आणि मयुरी सोमनाथ नाईकवडी या दोघींवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०७ आणि ३(५) अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

फक्त एका किरकोळ वादातून एवढं मोठं संकट ओढवलं जाईल, हे कुणालाच वाटलं नव्हतं. शमिकाच्या मृत्यूने तळवळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवलीकरांना दिलासा; काळू धरण प्रकल्प लवकर पूर्ण होणार, एकनाथ शिंदेंचे आश्वासन

कारवाई तर होणारच! इंडिगोच्या कारभारावर मुरलीधर मोहोळ यांचा थेट इशारा

भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळे थिरकल्या; कंगना रणौतचाही व्हिडीओ व्हायरल

स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं; दोघांचीही सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Goa Nightclub Fire Update : आगीत २५ जणांचा दुर्दैवी अंत तर ६ जण जखमी, पंतप्रधान राष्ट्रीय निधीतून मदत जाहीर