'हिंद-दी-चादर' समागमात नमुंमपाचा सर्वंकष सहभाग; आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व वाहतूक व्यवस्था सज्ज 
नवी मुंबई

Navi Mumbai : 'हिंद-दी-चादर' समागमात नमुंमपाचा सर्वंकष सहभाग; आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व वाहतूक व्यवस्था सज्ज

'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाला २८ फेब्रुवारीपासून भव्य प्रारंभ झाला असून देश-विदेशातून भाविकांचा ओघ सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व वाहतूक व्यवस्थेसह सर्वच सेवासुविधांची व्यापक तयारी केली आहे.

Swapnil S

नवी मुंबई : 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाला २८ फेब्रुवारीपासून भव्य प्रारंभ झाला असून देश-विदेशातून भाविकांचा ओघ सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, निवास व वाहतूक व्यवस्थेसह सर्वच सेवासुविधांची व्यापक तयारी केली आहे.

कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची मुख्य समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करून विविध विभागप्रमुखांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. लंगर व्यवस्थेसाठी नवी मुंबई बिल्डर्स असोसिएशन व एपीएमसी मार्केट व्यापारी संघटनांनी अन्नधान्य व पिण्याच्या पाण्याची सेवाभावी मदत दिली. २७ फेब्रुवारी रोजी सीबीडी बेलापूर येथील गुरुद्वारापासून ओवे मैदानापर्यंत नगरकीर्तन काढण्यात आले.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी 'ब्ल्यू', 'ऑरेंज' आणि 'पिंक' अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. ब्ल्यू पार्किंग (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या ५५० बसेस आणि ११३५ कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे. ऑरेंज पार्किंगमध्ये रायगड, रत्नागिरी आणि २५६० कार पार्किंगची सुविधा आहे. याशिवाय, कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्क, सेक्टर ६ परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे १४५० कार आणि १००० मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

'हिंद दी चादर' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास ३३ ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, वाहतूक शाखेकडून एक डीसीपी, एक एसीपी, २० अधिकारी आणि ५०० अंमलदार यांच्यासोबत ५००वार्डन नेमण्यात आलेले आहेत; ज्यामुळे वाहतूक जी आहे, ती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल. काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेता, पुरेसा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
तिरुपती काकडे, उपायुक्त वाहतूक नवी मुंबई

निवास व आरोग्य सुविधा

  • १८ ठिकाणी २,८०० हून अधिक बेड्सची व्यवस्था.

  • २५ डॉक्टर व ७५ पॅरामेडिकल कर्मचारी तैनात.

  • ४ अद्ययावत रुग्णवाहिका सज्ज; ३०० बेड्स उपचारासाठी राखीव.

  • १०६ एनएमएमटी बसेसच्या १,४०० फेऱ्यांचे नियोजन; २०० हून अधिक कर्मचारी तैनात.

  • जड वाहनांना सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत प्रवेशबंदी.

  • वाहतूक नियंत्रणासाठी १ डीसीपी, १ एसीपी, २० अधिकारी, ५०० अंमलदार व ५०० वॉर्डन तैनात.

  • १,००० शौचालयांची उभारणी

  • ५०० स्वच्छताकर्मी, २५ पर्यवेक्षक तैनात.

  • १० कचरागाड्या, डस्ट सप्रेशन व मेकॅनिकल स्वीपिंग मशीनद्वारे साफसफाई.

भव्य लंगर व्यवस्था

समागमात आठ ठिकाणी अखंड लंगर सेवा सुरू असून लाखो भाविकांनी लंगरचा लाभ घेतला. 'सेवा' आणि 'समता'चा संदेश देणारी ही परंपरा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली आहे. लंगरमध्ये पारंपरिक पद्धतीने रोटी, भाजी, डाळ, भात तसेच गोड पदार्थांची व्यवस्था करण्यात आली आहे. 'सेवा' हीच खरी श्रद्धा असल्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

बंजारा महिलांचे नृत्य; सामाजिक ऐक्याचा संदेश

खारघर येथे बंजारा समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विविध समाज शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, उदासीन तसेच संत नामदेव महाराजांच्या वारकरी संप्रदायातील भाविक यांच्या सहभागामुळे सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले.

३३ ठिकाणी रंग-कोडनिहाय पार्किंग

सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या ४०० बसेस आणि तब्बल ४९९० कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. पिंक पार्किंगमध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या २०० बसेस

धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसाठी SOP; मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कोंडीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत माहिती

Navi Mumbai : सुट्टीच्या दिवशीही कर संकलन कार्यालये सुरू राहणार

Thane : होळी-धुलिवंदन पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज; प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी कागदावरच ?

प्रसूती रजा नाकारू नका, मातृत्वाचा सन्मान राखा! मुंबई उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

Mumbai : मेट्रो ४ चा पहिला टप्पा १ एप्रिल रोजी खुला करणार; नोव्हेंबर २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार; माधुरी मिसाळ यांची माहिती