नवी मुंबई

क्रेनच्या चाकाखाली आल्याने मजुराचा मृत्यू

Swapnil S

नवी मुंबई : रोडलगतच्या खोदाईमध्ये केबल टाकण्याचे काम करणाऱ्या एका मजुराचा क्रेनच्या चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. खारघर पोलिसांनी या घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन ऑपरेटरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.

या घटनेतील मृत मजुराचे नाव सुनील नरसिंमा तांगडी (२०) हा असून तो बेलापूर येथे राहण्यास होता. सुनील हा त्याचा मामा निलफ्पा कवाली याच्यासोबत टेक्नोफ्लस कंपनीच्या वतीने खारघरमध्ये रोडलगत खोदाईमध्ये केबल टाकण्याचे काम करत होता. गत शनिवारी सुनील हा मामासोबत कामावर गेला होता. त्यानंतर सुनील व इतर कामगार हे खारघर सेक्टर-२१ मधील ग्राम विकास भवन समोरील रोडवर खोदाईमध्ये केबल टाकण्याचे काम करत होते. सकाळच्या सुमारास रोड लगतच्या खोदाईमध्ये केबल टाकण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने केबल ड्रम आणण्यात येत होते.

यावेळी सुनीलला केबल ड्रमचा धक्का लागल्याने तो क्रेनच्या चाकाजवळ पडला. त्यामुळे क्रेनचे चाक त्याच्या कमरेवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला कामोठे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला. या घटनेनंतर खारघर पोलिसांनी या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या क्रेन ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल

मुंबई विद्यापीठाचे आदेश धाब्यावर! फक्त ३५३ कॉलेजेसने केली 'सीडीसी'ची स्थापना; विद्यापीठाकडून गंभीर दखल

Video : गौहर खानच्या मुलाच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये गोंधळ, BMC ने एंट्री गेट उखडून टाकला

प्रसिद्धीसाठी जनहित याचिकेचा वापर करू नका, हायकोर्टाने खडसावले; याचिकाकर्त्यांने याचिकाच मागे घेतली