नवी मुंबई

नवी मुंबई : वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाणीपासून सावध राहा; आर्थिक गुप्तवार्ता पथकाचे आवाहन

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन सुरू केले आहे. मात्र, या मार्गदर्शन सत्रांच्या आडून काही फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी विद्यार्थ्यांना खोट्या आश्वासनांच्या आधारावर गंडा घालण्याची...

Swapnil S

नवी मुंबई : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीची प्रवेशप्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई व परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांनी मार्गदर्शन सत्रांचे आयोजन सुरू केले आहे. मात्र, या मार्गदर्शन सत्रांच्या आडून काही फसवणूक करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थांनी विद्यार्थ्यांना खोट्या आश्वासनांच्या आधारावर गंडा घालण्याची शक्यता असल्याचा गंभीर इशारा आर्थिक गुप्तवार्ता पथक, नवी मुंबई यांनी दिला आहे.

या संदर्भात बोलताना पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, मॅनेजमेंट कोट्यातून किंवा इतर कोणत्याही छुप्या मार्गाने वैद्यकीय प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली काही

व्यक्ती किंवा संस्था विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सर्वांनी सावध राहणे, आवश्यक आहे.

त्यांनी असेही स्पष्ट केले की, जर कोणतीही व्यक्ती किंवा संस्था वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश मिळवून देण्याच्या मोबदल्यात रोखीची मागणी करत असेल, तर संबंधित विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तत्काळ आर्थिक गुप्तवार्ता पथक, नवी मुंबई किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यास योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

वैद्यकीय प्रवेशप्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची आणि संवेदनशील बाब असून तिच्यात कोणताही अनधिकृत हस्तक्षेप किंवा आर्थिक देवाणघेवाण होणे गंभीर गुन्हा मानला जातो.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पूर्ण दक्षता घेऊन प्रवेशप्रक्रियेचा अधिकृत मार्गच अनुसरावा, असे आर्थिक गुप्तवार्ता पथकाने स्पष्ट केले आहे.

फसवणुकीपासून संरक्षण ही केवळ पोलिसांची नव्हे तर प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे, हे लक्षात घेऊन अधिक सजग आणि सतर्क राहावे, असे आवाहनही या पथकाकडून करण्यात आले आहे.

फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी -

  • कोणत्याही अनधिकृत व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या खासगी आश्वासनांवर विश्वास ठेवू नये.

  • प्रवेश प्रक्रिया ही फक्त अधिकृत शासकीय संकेतस्थळ किंवा अधिकृत संस्थाच चालवतात, याची खात्री करावी.

  • कोणत्याही आर्थिक व्यवहारात अधिकृत पावतीची मागणी करावी.

  • शंका वाटल्यास तत्काळ पोलिसांकडे किंवा आर्थिक गुप्तवार्ता पथकाकडे माहिती द्यावी.

काँग्रेसमधील काही नेत्यांच्या खुर्च्या धोक्यात येण्याची शक्यता; जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याने नाराजी

बाबर क्रूर, अकबर सहिष्णू, तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा’; NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

२० कोटींच्या १४ शौचालयांच्या प्रकल्पाला स्थगिती; शहरातील अतिरिक्त आयुक्त दोषी आढळल्यास कारवाई करणार - राहुल नार्वेकर

तेल वाहतूक कंत्राटांत एससी, एसटी आरक्षण बंधनकारक; केंद्राचा निर्णय हायकोर्टाने कायम ठेवला

त्रिभाषा सूत्र लागू करणारच! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णयावर ठाम