मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत 
नवी मुंबई

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवेचा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्णत्वाचा दिलेला मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. सुमारे ७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून अद्यापही पूर्णत्वापासून दूर आहे.

राजकुमार भगत

उरण : मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवेचा एप्रिल २०२६ अखेरपर्यंत पूर्णत्वाचा दिलेला मुहूर्त पुन्हा एकदा हुकला आहे. सुमारे ७५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून रखडले असून अद्यापही पूर्णत्वापासून दूर आहे.

उरण-मुंबई दरम्यान सध्या प्रवासी जलसेवा सुरू असली, तरी वाहनांसह प्रवास करता यावा यासाठी रो-रो सेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र या सेवेसाठी आवश्यक असलेली जेट्टी उभारणीची कामे संथगतीने सुरू आहेत. सुरुवातीला सुमारे ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा प्रकल्प आता ७५ कोटींवर पोहोचला आहे.

सध्या मोरा जेट्टीवर केवळ सांगाडा उभारण्यात आला असून प्रत्यक्ष काम अपूर्णच आहे. २०१८ पासून सुरू असलेल्या या प्रकल्पाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. मागील काही महिन्यांत कामाला गती मिळाल्याचे चित्र असले, तरी प्रत्यक्ष प्रगती मर्यादितच दिसून येते.

७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

दरम्यान, रेवस जेट्टीच्या कामातही सुमारे ५ कोटी रुपयांची खर्चवाढ झाली आहे. या दोन्ही जेट्टींची कामे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड यांच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र मोरा जेट्टीचे काम तब्बल नऊ वर्षांपासून रखडलेले असून जेट्टीपर्यंत जाणारा मार्गदेखील अद्याप पूर्ण झालेला नाही.

वारंवार काम बंद पडणे, निधीवाढ आणि नियोजनातील अडथळे यामुळे प्रकल्प पूर्ण होणार का, असा प्रश्न प्रवाशांमध्ये उपस्थित होत आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन