नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ | संग्रहित छायाचित्र  
नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाच्या उड्डाणाला अखेर मुहूर्त! २५ डिसेंबरपासून उड्डाण; अकासा एअर, इंडिगोचे वेळापत्रक अखेर जाहीर

नवी मुंबई विमानतळा वरून अखेर विमान उड्डाणं घेणे प्रत्यक्षात सुरु होणार आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून २५ डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळा वरून अखेर विमान उड्डाणं घेणे प्रत्यक्षात सुरु होणार आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसराच्या बदलत्या परिदृश्याचा ऐतिहासिक टप्पा म्हणून २५ डिसेंबर हा दिवस नोंदवला जाणार आहे. कारण याच दिवशी देशातील अत्याधुनिक नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआय) औपचारिकपणे प्रवासी सेवेसाठी सुरू होत आहे. या विमानतळाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी झाले होते. उद्घाटनानंतर केवळ दोन महिन्यांत विमानतळ पूर्ण क्षमतेने उड्डाण सेवेसाठी सज्ज झाले आहे.

पहिल्याच दिवशी प्रवाशांना आधुनिक टर्मिनल्स, सुटसुटीत प्रवासद्वारे, जलद प्रक्रियांमुळे सर्वोच्च दर्जाचा विमानप्रवास अनुभवता येणार आहे. नवी मुंबई, रायगड, ठाणे, कोकणातील लाखो प्रवाशांसाठी हे 'घराजवळचे विमानतळ' सिद्ध होणार आहे.

अकासा एअरचे पहिले उड्डाण

अकासा एअरने पहिल्या अधिकृत उड्डाणांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. उद्घाटनाच्या दिवशी दिल्ली ते नवी मुंबई या मार्गावर या विमानाचे उड्डाण होणार आहे. हे विमान सकाळी पाच वाजून २५ मिनिटांनी सुटून ८ वाजून १० मिनिटांना नवी मुंबई विमानतळावर हे विमान उतरेल. परतीचे उड्डाण ८ वाजून ५० मिनिटांनी निघून सकाळी सव्वा अकरा वाजता दिल्लीला पोहोचेल. अकासा एअरनंतर इंडिगो कंपनीनेही नवी मुंबई विमानतळावरून आपले उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे. ६ ई ५२६३ हे एक्सक्लुझिव्ह उड्डाण सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी एनएमआय विमानतळावरून सुटेल. तसेच हे विमान सव्वा अकरा वाजता दिल्ली येथील टी ३ या विमानतळावर पोहोचेल.

मुंबईच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरून प्रवास स्वस्त!

आकासा एअरने नव्या नवी मुंबई - दिल्ली मार्गासाठी विद्यमान मुंबई - दिल्ली मार्गापेक्षा कमी भाडे ठेवत स्पर्धात्मक पाऊल टाकले आहे. उद्घाटनाच्या दिवशी - २५ डिसेंबरला नवी मुंबई ते दिल्लीचे भाडे ६,००६ रुपये आहे. तर मुंबई ते दिल्लीचे भाडे ७,१०२ रुपये आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या तुलनेत नवी मुंबई विमानतळावरील प्रवासाचे भाडे कमी आहे. २६ डिसेंबरला नवी मुंबई ते दिल्लीचे तिकीट ५,७०५ रुपये दर्शविण्यात येत असून मुंबई ते दिल्लीचे किमान भाडे ५,७७६ रुपये आकासा एअर कंपनी नव्या विमानतळावरून प्रवासी आकर्षित करण्यासाठी स्पर्धात्मक भाडे ठेवत असल्याचे स्पष्ट होते. नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या वेळापत्रकामुळे प्रदेशातील हवाई भाड्यांच्या संरचनेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी