संग्रहित छायाचित्र 
नवी मुंबई

Navi Mumbai Airport : प्रवाशांना मिळणार फ्री ‘हायस्पीड वाय-फाय’ आणि 'डिजिटल-फर्स्ट' सुविधा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होताच मोफत ‘हायस्पीड वाय-फाय’सह ‘डिजिटल-फर्स्ट’ प्रवासी संवाद प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

Krantee V. Kale

नवी दिल्ली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होताच मोफत ‘हायस्पीड वाय-फाय’सह ‘डिजिटल-फर्स्ट’ प्रवासी संवाद प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

फ्री हायस्पीड वाय-फाय

प्रवाशांना विमानतळ टर्मिनलवर १० एमबीपीएस पर्यंत मोफत हाय-स्पीड वाय-फाय मिळेल. हे वायफाय नेटवर्क उच्च ट्रॅफिकच्या वेळीही स्थिरता आणि उच्च क्षमतेने देण्यासाठी डिझाइन केले आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळीही व्हिडिओ कॉल करणे, संगीत स्ट्रीम करणे, डिजिटल पेमेंट करणे आणि कॅब बुक करणे सोपे होईल. मेसेजिंग, डिजिटल पेमेंट्स, ॲप-आधारित कॅब बुकिंग, ईमेल, स्ट्रिमिंग आणि व्हिडिओ कॉल्सलाही हे नेटवर्क सपोर्ट करेल.

व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून करेल काम

विमानतळाच्या वाय-फाय नेटवर्कशी जोडणाऱ्या प्रवाशांना ‘अदानी वनअॅप’द्वारे रिअल-टाइम अपडेट्स मिळतील. हे अॅप व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करेल आणि टर्मिनलमधील महत्त्वाच्या टचपॉइंट्सवर प्रवाशांना मार्गदर्शन करेल. तसेच, प्रवाशांच्या मोबाईलवर उड्डाण स्थिती अलर्ट, बोर्डिंग गेट माहिती, वेळापत्रक आणि इतर ऑपरेशनल नोटिफिकेशन्स थेट पाठवेल. या उपक्रमाचा उद्देश भौतिक माहिती केंद्रे आणि स्थिर डिस्प्ले बोर्ड्सवरील अवलंबित्व कमी करणे आणि वैयक्तिकरित्या वेळेवर अपडेट्स देणे हा आहे.

शॉपिंग आणि खान-पान

‘अदानी वनअॅप’मध्ये खाद्य व पेय आउटलेट्स, किरकोळ स्टोअर्स, लाऊंजेस आणि इतर टर्मिनल सुविधांची माहितीही उपलब्ध असेल, ज्यामुळे प्रवासी विमानतळावरील त्यांचा वेळ अधिक चांगल्या प्रकारे नियोजित करू शकतील. विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की,

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल