नवी मुंबईतील एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल; सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याची बाजी, हवामानातील बदलांमुळे चिंता कायम संग्रहित छायाचित्र
नवी मुंबई

नवी मुंबईतील एपीएमसीत हापूसची पहिली पेटी दाखल; सिंधुदुर्गच्या शेतकऱ्याची बाजी, हवामानातील बदलांमुळे चिंता कायम

कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Swapnil S

नवी मुंबई : कोकणातील हापूस आंब्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाच्या हंगामातील हापूस आंब्याची पहिली पेटी नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, दिवाळी पाडव्याच्या तब्बल १५ दिवस आधीच हापूसचे आगमन झाल्याने बाजारात उत्सुकता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील शेतकरी निलेश बानकर यांनी सहा डझन आंब्यांची पहिली पेटी व्यापारी अभिजीत भुजबळ यांच्याकडे पाठवली. पेटी बाजारात दाखल होताच तिचे विधिवत पूजन करण्यात आले.

साधारणपणे दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर हापूस आंब्याची पहिली पेटी एपीएमसी बाजारात दाखल होते. मात्र, यंदा अपेक्षेपेक्षा लवकर आंब्याचे आगमन झाले आहे. हवामानातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे आंब्याच्या हंगामाचे वेळापत्रक बदलल्याचे चित्र आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि हवामानातील अनिश्चिततेचा परिणाम हापूसच्या उत्पादनावर होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आगामी काळात कोकणात अपेक्षित पाऊस आणि थंडी न पडल्यास फळधारणा, उत्पादन आणि फळांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. पहिली पेटी दाखल झाल्याने आंबाप्रेमींमध्ये उत्साह असला, तरी आगामी हंगामाचे भवितव्य हवामानाच्या स्थितीवर अवलंबून राहणार आहे.

निसर्गाचा लहरीपणा असतानाही मेहनतीने हापूसची पहिली पेटी बाजारात पोहोचवली आहे. मात्र, दुष्काळ आणि आगामी काळातील थंडी-पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. हवामानाची साथ न मिळाल्यास संपूर्ण हंगामावर परिणाम होऊ शकतो.
निलेश बानकर, शेतकरी
दरवर्षी दिवाळी पाडव्याला हापूसची पहिली पेटी दाखल होते. यंदा विजयदुर्ग येथून १५ दिवस आधीच सहा डझनांची पेटी आली आहे. तिचे विधिवत पूजन केले. मात्र, पुढील आवक आणि दर हे हवामानावर अवलंबून असतील.
अभिजीत भुजबळ, व्यापारी

Mumbai : आणखी पाच वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे; पालिका १८ कोटी रुपये खर्च करणार

Mumbai : वांद्रे टर्मिनसचा विस्तार होणार; गरीबनगरमधील ९४ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त, पश्चिम रेल्वेचा दणका

किल्ल्यांच्या सुरक्षेसाठी कंत्राटी रक्षक; प्रतापगड, राजगड, साल्हेर, खांदेरीसाठी २.९३ कोटींची मान्यता

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण : आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना मारहाण?

Thane : आता सोमवारी पाणीकपात; मनपा क्षेत्रात १० टक्के कपात २ नोव्हेंबरपासून लागू