डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी विकास आराखडा सुसंगत करा; राष्ट्रीय हरित लवादाचे सिडकोला निर्देश 
नवी मुंबई

Navi Mumbai : डीपीएस फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी विकास आराखडा सुसंगत करा; राष्ट्रीय हरित लवादाचे सिडकोला निर्देश

नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांनी नियुक्त केलेल्या संयुक्त तपासणी समितीने सिडकोला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. भरती-ओहोटीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करणे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन विकास आराखडा सुसंगत करणे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

Swapnil S

उरण : नवी मुंबईतील डीपीएस फ्लेमिंगो तलावाच्या संवर्धनासाठी राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांनी नियुक्त केलेल्या संयुक्त तपासणी समितीने सिडकोला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. भरती-ओहोटीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करणे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या पर्यावरणीय गरजा लक्षात घेऊन विकास आराखडा सुसंगत करणे, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांनाही फ्लेमिंगो अधिवास जतनासाठी आवश्यक उपाययोजना करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई पर्यावरण संरक्षण संस्थेचे संदीप दरीन यांनी नमूद केले की, या विषारी शेवाळामुळे फ्लेमिंगो पक्षी तलावावर उतरण्याऐवजी त्यावरूनच उडून जात आहेत. या पार्श्वभूमीवर नॅटकनेक्ट फाउंडेशनने राज्य पाणथळ प्राधिकरणाकडे नियमभंगाबाबत तक्रार दाखल केली असून हे न्यायालयाचा अवमान ठरू शकते, असा इशारा बी. एन. कुमार यांनी दिला.

राज्यस्तरीय समितीने यापूर्वीच या क्षेत्राला ‘संवर्धन राखीव’ दर्जा देण्याची शिफारस करत पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचेही निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षी तलावात सात फ्लेमिंगोंचा मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले होते. माध्यमांतील वृत्तांची दखल घेत हरित लवादाने स्वयंप्रेरणेने समिती स्थापन केली होती. या समितीत वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, सिडको आणि मनपा प्रतिनिधी सहभागी होते.

२८ एप्रिल रोजी न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजीत कुमार बाजपेयी यांनी दिलेल्या आदेशानुसार सिडकोला पक्षीशास्त्र तज्ज्ञ संस्थेकडून प्रकाश प्रदूषणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम व स्थलांतर नमुन्यांचा अभ्यास करणे. विमानतळावर फ्लेमिंगोंमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य ‘बर्ड हिट’ धोक्याची तज्ज्ञांकडून पडताळणी करणे. सर्व शिफारसींचे मूल्यांकन करून दोन महिन्यांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फ्लेमिंगो संवर्धनासाठी ठोस पावलांची अपेक्षा

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे खाडी परिसरातील स्थलांतरित पक्षी साधारणतः ५० मीटरपेक्षा कमी उंचीवर उडतात, तर विमाने त्यापेक्षा खूप जास्त उंचीवर असतात. त्यामुळे डीपीएस, एनआरआय आणि टीएस चाणक्य परिसरातील आर्द्रभूमींचा विमानवाहतुकीला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्देशांमुळे फ्लेमिंगो अधिवास संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सिडको ने किनारी नियमन क्षेत्र (CRZ) निर्बंधांचा दाखला देत तलावातील महत्त्वाच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम थांबवले आहे. परिणामी, एक प्रमुख वाहिनी बंद राहिल्याने तलावात विषारी आणि घनदाट शेवाळ साचले आहे. त्यामुळे मॅंग्रोव्ह विभागाला शेवाळ हटवणे आणि फ्लेमिंगोंसाठी योग्य अधिवास निर्माण करणे कठीण झाले आहे.
बी. एन. कुमार, संचालक नॅटकनेक्ट फाऊंडेशन

शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! आता दरवर्षी ५० तासांचे प्रशिक्षण अनिवार्य; शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

मोरा-मुंबई रो-रो सेवेचा एप्रिलचा मुहूर्त पुन्हा हुकला; ७५ कोटी रुपयांचा प्रकल्प रखडलेल्या स्थितीत

खड्डा चुकवताना रिक्षा थेट नदीत कोसळली; पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, एक जखमी

देवस्थानांकडचे मोठे भूखंड होणार खुले; इनामी जमीन रद्द करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव

मोठी बातमी! सुधारित पेन्शन योजना आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक; शासनाकडून नवीन परिपत्रक जारी