नवी मुंबई

४०० कोटींचे रोखे काढणार; नवी मुंबई मनपाचा २०२६-२७ चा ६७०४ कोटींचा अर्थसंकल्प सादर

नवी मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मासिक सर्वसाधारण सभेत सादर केला. विकास कामांसाठी महापालिका सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढणार आहे. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला.

Swapnil S

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ६७०४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मासिक सर्वसाधारण सभेत सादर केला. विकास कामांसाठी महापालिका सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढणार आहे. स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महापौर सुजाता पाटील यांच्याकडे हा अर्थसंकल्प सुपूर्द केला. गेल्या २५ वर्षांची परंपरा कायम राखत आगामी २० वर्षांतही कोणतीही करवाढ केली जाणार नाही, असे महत्त्वाचे अभिवचन या अर्थसंकल्पातून देण्यात आले आहे.

यंदाचा अर्थसंकल्प स्थायी समितीने तयार करून तो स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी महासभेत मांडला. या अर्थसंकल्पात शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यावर आणि महापालिकेचा कारभार पेपरलेस करण्यावर स्थायी समितीने विशेष भर दिला आहे.

आयुक्तांनी यंदा फक्त खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. त्यानंतर स्थायी समितीने अर्थसंकल्प तयार करून तो महासभेत मांडला. २०२६-२७ या आर्थीक वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील यांनी वस्तु व सेवा कर अनुदानापासून १८९७ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षीत धरले आहे. मालमत्ता करातून १२०० कोटी रुपये उभा राहण्याचा अंदाज आहे.

महापालिकेला सर्वच महसुलातून मिळणारे उत्पन्न ४३३७ कोटी रुपये अपेक्षीत धरलेले असताना अर्थसंकल्प मात्र ६७०४ कोटी रुपयांचा सादर केला. २०२५-२६ या आर्थीक वर्षात पालिकेचे महसुली उत्पन्न हे अडीच हजार कोटींच्या आसपास होते.

पामबिच मार्गावर उभे राहणार उड्डाणपूल

पामबिच मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन स्थायी समितीने केले असून त्यासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ठोक मानधन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

नवी मुंबई महापालिकेतील कर्मचारी, शिक्षक कंत्राटी पद्धतीने काम करतात त्यांच्या पगारात वाढ करण्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

पुन्हा वन टाईम प्लॅनिंग

‘वन टाईम प्लॅनिंग’ ही संकल्पना आता पुन्हा राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक नोडमध्ये एका सेक्टरची निवड करून या क्षेत्राचा विकास २५ ते ५० वर्षांचे नियोजन करून करण्यात येणार आहे. महापालिका मुख्यालय जंक्शनवरही सुधारणा करण्याची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

१० वर्षांनी लोकप्रतिनिधींनी पहिल्यांदाच हा अर्थ संकल्प मांडला आहे. यात जनतेच्या हिताचे कार्य आणि महानगर पालिकेत कर रुपी येणारा पैसा याचा समन्वय साधला आहे. वन टाइम प्लॅनिंग , ठोक मानधनावरील कामगारांची पगारवाढ असे चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत.
अशोक पाटील (स्थायी समिती सभापती)

अर्थसंकल्पातील निर्णय

  • ‘डेटा सेंटर हब’ ला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातील पाणी विकणार

  • ५० वर्षांच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी पाताळगंगा नदीतून १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा योजना

  • घणसोलीत भव्य क्रीडा संकुलाची उभारणी. १५०० कोटींची योजना

  • सीवूड्सला सीबीएसई शाळेची उभारणी

  • नगरसेवकांच्या प्रभाग निधीत १११ कोटींची तरतूद

  • महापालिकेचा कारभार ‘पेपरलेस’ करणार

Mumbai : २३,००० पाणथळ जागांची प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण; कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा

Pune : रेडिओ-कंट्रोल्ड इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी निर्मिती; ‘प्रोजेक्ट गरुडा’ची इंडिया व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Melodi Team पुन्हा चर्चेत; पंतप्रधान मोदींच्या खास Melody गिफ्टने जिंकली नेटकऱ्यांची मनं, Video व्हायरल

Mumbai : सेव्हन हिल्स रुग्णालयावर खासगी संस्थेचे वर्चस्व; ६० वर्षांचा करार, सुधार समितीत पडसाद उमटणार

Mumbai : डिसेंबरपर्यंत ग्रीन बाँड बाजारात; मोठ्या प्रकल्पांचा खर्च भागविण्यासाठी तसेच उत्पन्नवाढीसाठी BMC चा निर्णय