नवी मुंबई

नवी मुंबईत महिलांना राजकीय बळ! १११ पैकी तब्बल ५६ जागा महिलांसाठी राखीव

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण निश्चिती आणि सोडत प्रक्रिया वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आरक्षण निश्चिती आणि सोडत प्रक्रिया वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुव्यवस्थित आणि पारदर्शकरीतीने पार पडल्याचे महापालिकेने स्पष्ट केले.

विष्णुदास भावे नाट्यगृहात विभागनिहाय आरक्षण सोडत होत असल्याने शहरातील माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.

निवडणुका अधिकृतपणे घोषित झाल्याही नाहीत, तरी काही इच्छुकांच्या गाड्यांवर मनपाचा लोगो आणि ‘नगरसेवक/नगरसेविका’ अशी स्टिकर्स झळकत असल्याचेही आढळून आले.

लोकसंख्या आधारित आरक्षण २०११ च्या जनगणनेनुसार

  • एकूण लोकसंख्या : ११,३६,१७०

  • अनुसूचित जाती : १,००,८३९

  • अनुसूचित जमाती : १९,६४६

लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने पुढीलप्रमाणे आरक्षण निश्चित

  • अनुसूचित जाती : १० प्रभाग

  • अनुसूचित जमाती : १ प्रभाग

  • नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) : २९ जागा (१११ मधील २७%) महिला आरक्षण

(किमान ५६ महिला सदस्य अनिवार्य) प्रत्येक प्रभागात किमान २ महिला सदस्य असलेच पाहिजेत, या निकषानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले.

प्रभाग रचना व निवडणूक संरचना

राज्य निवडणूक आयोगाने नवी मुंबईसाठी ४ सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली आहे.

  • एकूण सदस्यसंख्या : १११

  • प्रभागांची संख्या : २८

  • २७ प्रभाग : ४ सदस्यीय

  • १ प्रभाग : ३ सदस्यीय (अपवाद)

  • प्रवर्गनिहाय - अंतिम आरक्षण सूची

१. अनुसूचित जाती (SC) आरक्षण

  • SC प्रभाग : ३(अ), ६(अ), ७(अ), ८(अ), २२(अ)

  • SC (महिला) प्रभाग :१(अ), २(अ), ४(अ), २०(अ), २८(अ)

२. अनुसूचित जमाती (ST) आरक्षण

ST प्रभाग : ८(ब), ST (महिला) प्रभाग : ६(ब)

३. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (OBC) एकूण २९ जागा

OBC प्रभाग : २(ब), ४(ब), ५(ब), ६(क), ९(अ), १०(अ), १२(अ), १३(अ), १५(अ), १७(अ), १९(अ), २४(अ), २५(अ), २६(अ), OBC (महिला) १५ प्रभाग : १(ब), ३(ब), ५(अ), ७(ब), ८(क), ११(अ), १४(अ), १६(अ), १८(अ), २०(ब), २१(अ), २२(ब), २३(अ), २७(अ), २८(ब)

४. सर्वसाधारण (General) :

१(क), १(ड), २(ड), ३(ड), ४(ड), ५(ड), ७(ड), ९(ड), १०(ड), ११(क), ११(ड), १२(ड), १३(ड), १४(क), १४(ड), १५ (ड), १६(क), १६(ड), १७(ड), १८(क), १८(ड), १९(ड), २० (क), २०(ड), २१(क), २१(ड), २२(ड), २३(क), २३ (ड), २४(ड), २५(ड), २६(ड), २७(क), २७(ड), २८(क)

सर्वसाधारण (महिला) प्रभाग :

२(क), ३(क), ४(क), ५(क), ६ (ड), ७ (क), ८ (ड), ९(ब), ९(क), १०(ब), १०(क), ११(ब), १२(ब), १२(क), १३(ब), १३(क), १४(ब), १५(ब), १५(क), १६(ब), १७(ब), १७(क), १८(ब), १९(ब), १९(क), २१(ब), २२(क), २३(ब), २४(ब), २४(क), २५(ब), २५(क), २६(ब), २६(क), २७(ब)

येत्या १७ नोव्हेंबर रोजी इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यावर चर्चा करून २ डिसेंबरपर्यंत आरक्षण सोडतीवर शिक्कामोर्तब केले जाईल.- डॉ. कैलास शिंदे (मनपा आयुक्त)

Mumbai : सँडहर्स्ट रोड रेल्वे दुर्घटनेला जबाबदार कोण? ५ दिवस उलटले तरी FIR नाही

मुंब्रामध्ये ATS ची मोठी कारवाई; शिक्षकाच्या घरावर छापा, अल-कायदा प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय

सांगलीत हत्येचा थरार! आधी बर्थडे पार्टीत जेवले, मग केले सपासप वार; दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाचा खून

मुंबईत शुक्रवारी पाणीपुरवठा बंद; कुर्ला, चेंबूर, घाटकोपर व माटुंगा विभागातील काही परिसरांना झळ बसणार

अचानक बेशुद्ध पडल्याने अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल