नवी मुंबई

उत्पन्नवाढीसाठी नवी मुंबई पालिकेचा टास्क फोर्स; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष देत विशेष कार्यबळाची अर्थात टास्क फोर्सची स्थापना केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसूलीकरिता व विद्यमा

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीकडे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी बारकाईने लक्ष देत विशेष कार्यबळाची अर्थात टास्क फोर्सची स्थापना केली असून ही पाच सदस्यीय समिती महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता उपाय सुचविणार आहे. त्यामध्ये थकबाकी वसूलीकरिता व विद्यमान वसूलीकरिता नियोजन करून सोबतच उत्पन्न वाढीचे नवीन स्त्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले आहेत.

अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स कार्यरत असणार असून मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मालमत्ता कर विभागाचे उप आयुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण असे चार सदस्य महानगरपालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत.

उत्पन्न वाढीसाठी उपाय सूचविताना टास्क फोर्सने विद्यमान कार्यपद्धतीने कोणते बदल करावे लागतील याच्या सूचना कराव्यात व असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने व किती दिवसात करता येईल आणि कधीपासून उत्पन्न वाढ होईल, हे प्रस्तावात नमूद करावे, असे सूचित करण्यात आलेले आहे.

थकबाकी, चालू वसूली व नवीन स्त्रोतामधून अपेक्षित वाढ याचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत. याशिवाय खर्चात बचत ही एक प्रकारे उत्पन्न वाढ असून त्यादृष्टीने अवाजवी खर्च टाळून व आवश्यक तेथे काटकसर करून खर्चामध्ये किती बचत होईल, याचीही माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.

त्यासोबतच शक्य आहे तेथून शासन निधी प्राप्त करून घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि अशी कामे शासन निधीतून करून महानगरपालिकेचा निधी इतर सुविधा कामांसाठी वापरण्याबाबत सूचना कराव्यात असे सूचित करण्यात आले आहे. दुबार योजनांचा शोध घेऊन त्या योजना बंद करण्याबाबत अभिप्राय द्यावेत तसेच इतर महानगरपालिकांमध्ये राबविण्यात येणाऱ्या उत्पन्न वाढीच्या चांगल्या कार्यपद्धती अभ्यासून त्यांचे अनुकरण करण्याबाबत सूचना कराव्यात असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन