Navi Mumbai : 'नैना'त १५ लाख रोजगार निर्मिती; भूमिपुत्रांना प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही X|CMOMaharashtra
नवी मुंबई

Navi Mumbai : 'नैना'त १५ लाख रोजगार निर्मिती; भूमिपुत्रांना प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पाच लाख रोजगार गलेलठ्ठ वेतनाच्या असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल.

Swapnil S

पनवेल : नैना (नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र) परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून सुमारे १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी पाच लाख रोजगार गलेलठ्ठ वेतनाच्या असतील. या विकासातून निर्माण होणाऱ्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येईल. शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांना विकासाचे भागीदार बनविण्यासह आधुनिक पायाभूत सुविधा आणि सक्षम कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ‘तिसरी मुंबई’ महाराष्ट्राच्या विकासाचे नवे ग्रोथ इंजिन ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना परिसरातील विकासकामांचे भूमिपूजन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील जोडणीसाठी विकसित करण्यात आलेल्या एसबीआर-९, बीआर-४, बीआर-५ आणि उरण बायपास पूल या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटपही फडणवीस यांनी केले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा केवळ विमानतळ नसून संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण घटक आहे. विमानतळाच्या प्रभाव क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि कालबद्ध विकास करण्यासाठी एकात्मिक विकास आराखडा तयार करून नगररचना योजनांच्या माध्यमातून या परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्यात येत आहे. या नियोजनबद्ध विकासातून रोजगार निर्मितीला अधिक प्रमाणात चालना देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. भूधारकांच्या हातात जमिनीशी संबंधित कागदपत्रे दिल्यानंतरच विकासकामांचे भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गावनिहाय मोजणी, भूखंडांची ओळख, मालकी नोंदी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया पुढे नेण्यात येत आहे. भूधारकांचे प्रश्न सुटेपर्यंत राज्य सरकार त्यांच्या पाठीशी राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

नैना क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सक्षम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, नैना परिसरातील विकासकामे ही पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे.

महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन - एकनाथ शिंदे

नैना क्षेत्रातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावून या परिसराच्या विकासाला गती देण्याच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतूमुळे पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगड परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, हा परिसर महाराष्ट्राचे नवे ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येत असून विमानतळाला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या लोकार्पणामुळे मुंबई-पुणे महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांशी जोडणी अधिक सक्षम होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

प्रकल्प पर्यावरणपूरकच; टोरंटबाबत मुख्यमंत्र्यांचे सडेतोड उत्तर; विरोधकांकडून केवळ 'फेक नरेटिव्ह'...

रोहित पवार, मफलरवाले गेले कुठे?

आजचे राशिभविष्य, २६ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवाळीत सुंदर दिसायचंय? आजपासूनच सुरू करा ३ गोष्टी; चेहरा, केस आणि फिटनेससाठी ऋजुता दिवेकरांनी सांगितला सोपा मार्ग

Skin Care : ग्लोइंग स्किनसाठी फेस मसाज करता? त्वचेनुसार योग्य स्टोन कसा निवडाल?