ठाण्यात 'एसआयआर'ची गती मंद; ७४.५० लाख मतदारांपैकी केवळ २८ टक्क्यांपर्यंतच BLO पोहोचले (संग्रहित फोटो)
नवी मुंबई

Navi Mumbai : एसआयआर प्रक्रियेत ऐरोली-बेलापूरमध्ये गोंधळ; मतदारांची नावे वगळण्याची भीती

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

Swapnil S

नवी मुंबई: मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांत मोठ्या प्रमाणात त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी बीएलओ घराघरांत पोहोचले नसल्याने नागरिकांना ईएफ फॉर्म मिळविण्यासाठी त्यांचा शोध घ्यावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.

ईएफ फॉर्म भरून जमा केल्यानंतरही काही मतदारांची नावे फॉर्म न भरलेल्या मतदारांच्या यादीत आल्याच्या तक्रारी आहेत. तसेच काही फॉर्म वेळेत अपडेट न करणे, फॉर्म हरवणे आणि प्रत्यक्ष पडताळणी न करताच काही मतदारांना 'एनए' घोषित केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

निवडणूक विभागाने जमा झालेले सर्व ईएफ फॉर्म तातडीने अपडेट करावेत, तसेच 'एनए' घोषित करण्यात आलेल्या मतदारांची फेरपडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पात्र मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.

काही बीएलओंचा कामचुकारपणा आणि हलगर्जीपणा यामुळे नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे एसआयआर मोहिमेचा कालावधी वाढवून बीएलओंना अधिक जबाबदारीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात.
दशरथ भगत, उपमहापौर, नवी मुंबई

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Pune : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तार, स्थलांतराचा वाद पेटला

'बर्गर किंग'चा अन्न परवाना रद्द; नागपूर, सोलापुरातही बेकायदा औषध विक्रीविरोधात धडक मोहीम

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

इंडोनेशिया पुन्हा हादरले! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा हाय अलर्ट; VIDEO