नवी मुंबई

नवी मुंबईत १३.९१ कोटींचा मुद्रांक शुल्क घोटाळा; दुय्यम निबंधकासह एजंटवर गुन्हा दाखल

नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील १४१ दस्तांची बेकायदेशीर नोंदणी करून शासनाचा तब्बल १३ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Swapnil S

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील १४१ दस्तांची बेकायदेशीर नोंदणी करून शासनाचा तब्बल १३ कोटी ९१ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलिसांनी कोपरखैरणे येथील कार्यालयातील तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधकासह दस्त नोंदणी एजंट व इतरांवर सरकारी पदाचा गैरवापर करून शासनाची व जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या मोठ्या घोटाळ्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

कोपरखैरणे येथील सहदुय्यम निबंधक, सहकारी संस्था (सिडको) कार्यालयात सप्टेंबर २०२४ ते जुलै २०२५ या कालावधीत प्रभारी सह दुय्यम निबंधक म्हणून राजकुमार दहिफळे कार्यरत होते. या काळात दहिफळे यांनी दस्त नोंदणी एजंट योगेश चव्हाण व इतरांच्या संगनमताने अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदेशीर नोंदणी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ठाणे येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाने संबंधित दस्त नोंदणी कागदपत्रांची तपासणी केली. तपासणीदरम्यान तत्कालीन प्रभारी सह दुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे यांनी भारतीय नोंदणी अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करून सिडको क्षेत्रातील अनधिकृत इमारतींमधील १४१ दस्तांची बेकायदेशीर नोंदणी केल्याचे आढळून आले. या नोंदणीदरम्यान जाणूनबुजून कमी मुद्रांक शुल्क आकारण्यात आल्याने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचे १३ कोटी ९१ लाखांहून अधिक नुकसान झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल शासनाकडे पाठविण्यात आल्यानंतर दोषींवर कारवाईचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ठाणे येथील प्रभारी सह दुय्यम निबंधक ज्योती राऊत यांनी बुधवारी तुर्भे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणी तत्कालीन प्रभारी सहदुय्यम निबंधक राजकुमार दहिफळे, एजंट योगेश चव्हाण व इतरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

वरातीमधील डीजेच्या कर्कश आवाजामुळे १४० कोंबड्या मृत्युमुखी; कुक्कुटपालन व्यावसायिकाची पोलिसांकडे तक्रार दाखल

नवी मुंबई APMC त कलिंगड विक्रेते हवालदिल; अफवांमुळे विक्रीत ३० टक्के घट

भय्यांना मराठी शिकवून काय साध्य होणार? राज ठाकरे यांचा सवाल राज्यकर्त्यांवर आणि माध्यमांवरही टीका