नवी मुंबई

Navi Mumbai : धबधब्यावर अडकलेल्या ५ तरुणांची सुटका

खारघर येथील गोल्फ कोर्स आणि ड्रायव्हिंग रेंजच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर ७०० मीटर आत असलेल्या धबधबाच्या खाली अडकलेल्या ५ व्यक्तींना खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. पाचही तरुण सायन कोळीवाडा येथील आहेत.

Swapnil S

नवी मुंबई : खारघर येथील गोल्फ कोर्स आणि ड्रायव्हिंग रेंजच्या पाठीमागे असलेल्या डोंगरावर ७०० मीटर आत असलेल्या धबधबाच्या खाली अडकलेल्या ५ व्यक्तींना खारघर अग्निशमन जवानांनी दोरीच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले. पाचही तरुण सायन कोळीवाडा येथील आहेत.

२ दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे पांडवकडा धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. सायन कोळीवाडा येथील आंबेडकर चाळीत राहणारे महेश सुभाष शिरगड (२२), राकेश वेलमुर्गन (१८), प्रतीक जोग (१८), रमेश चिंगमेटे (१९) आणि साहील शेख (२१) हे पाचही तरुण खारघर, सेक्टर-६ मधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या ड्रायव्हिंग रेंजच्या रस्त्याने गोल्फ कोर्सच्या मागील बाजूस असलेल्या धबधब्याचा आनंद घेत होते.

दरम्यान, दुपार नंतर पावसाचा जोर वाढल्याने हे पाचही तरुण धबधब्याखाली अडकल्याची माहिती खारघर अग्निशमन केंद्राला प्राप्त होताच दोरीच्या मदतीने अग्निशमन जवानांनी पाचही तरुणांची सुखरूप सुटका करून त्यांना खारघर पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video