नवी मुंबई

Panvel : ट्रेलरच्या धडकेत भाऊ-बहिणीचा मृत्यू

पनवेल-जेएनपीटी मार्गावर भरधाव ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सख्ख्या भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालकाला ताब्यात घेतले आहे.

Swapnil S

पनवेल : पनवेल-जेएनपीटी मार्गावर भरधाव ट्रेलरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सख्ख्या भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पनवेल शहर पोलिसांनी ट्रेलरचालकाला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात प्रांशु भारद्वाज सिंग (१८) आणि त्याची बहीण वंशिका भारद्वाज सिंग (२०) यांचा मृत्यू झाला.

दोघेही पनवेलमधील इंडिया बुल्सच्या डेफोनिक्स टॉवरमध्ये राहत होते. ते दुचाकीवरून पनवेल-जेएनपीटी मार्गाने जेएनपीटीच्या दिशेने जात असताना मागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रेलरने त्यांच्या दुचाकीला डाव्या बाजूने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर दुखापतीमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक तपासात ट्रेलरचालक राजीवकुमार विजयशंकर याने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवल्याचे निष्पन्न झाले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बदलापुरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात; १६ ऑक्टोबरपासून चक्राकार पद्धतीने पाणीपुरवठा बंद

Mumbai : स्वतः बसवलेल्या CCTV मध्येच कैद झाला मृत्यूचा क्षण! घाटकोपरमध्ये भरधाव कारच्या धडकेत BMC कर्मचाऱ्याचा मृत्यू

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Kalyan-Dombivli : केडीएमसीत ३६ तास पाणीकपात; १५ ऑक्टोबरला २४ तास पाणीपुरवठा बंद

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...