नवी मुंबई

मीरारोडमध्ये पोलिसांकडून शांतता स्थापित; दंग्यानंतर आतापर्यंत १६ जणांना अटक

Swapnil S

भाईंंदर : मीरारोडमध्ये हिंसक घटनेनंतर आता पोलिसांकडून शांतता स्थापित करण्यात आली आहे. मीरारोडच्या नयानगरमध्ये घडलेल्या हिंसक घटनेचे पडसाद शहरात अन्यत्र देखील उमटले असून, दोन्ही गटातील दंगेखोरांवर विविध पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल होऊन १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ४ जण अल्पवयीन असून, उर्वरित आरोपीना २ ते ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मीरारोडच्या नयानगर भागामध्ये दोन गटात वादावादी झाली. भाईंदरमध्ये राहणाऱ्या एका गटातील लोकांनी कार व दुचाकी वर झेंडे लावत नयानगर भागातील दुसऱ्या गटाच्या धार्मिक स्थळ परिसरात घोषणा दिल्या. त्यातून दुसऱ्या गटाने लाठ्या काठ्या, वजन, दगड आदी घेऊन हल्ला चढवत गाड्यांची तोडफोड व मारहाण केली. त्याचे पडसाद शहरात उमटू लागले, भाईंदर, काशिमीरा पोलीस ठाण्यात दुसऱ्या गटाच्या लोकांना मारहाण, तोडफोड प्रकरणी ३ गुन्हे दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, परिमंडळ-१ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे आणि मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, अनैतिक मानवी वाहतूक शाखा, मुख्यालयातील पोलीस कर्मचारी व विशेष शाखा असे सर्व व स्थानिक पोलीस कर्मचारी असे २०० पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या ६ तुकड्या, दंगल नियंत्रण पथकांच्या ३ तुकड्या तसेच बाहेर जिल्ह्यातून व पोलीस आयुक्तांलयातून ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी बोलावून शक्ती प्रदर्शन करत बंदोबस्त लावण्यात आला.

आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरू

पोलिसांकडून रूट मार्च काढून शांतता अबाधित राहण्यासाठी संदेश देण्यात आला. सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावरील मेसेजवर खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नये.

- श्रीकांत पाठक, अप्पर पोलीस आयुक्त

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल