उरण : रानसई धरणाने तळ गाठल्याने पाणीसंकट; अवघा दोन फूट पाणीसाठा शिल्लक, २५ जूनपर्यंतच पाणी पुरणार 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
नवी मुंबई

उरण : रानसई धरणाने तळ गाठल्याने पाणीसंकट; अवघा दोन फूट पाणीसाठा शिल्लक, २५ जूनपर्यंतच पाणी पुरणार

उरण तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणीपातळी अत्यंत चिंताजनक पातळीवर खालावली असून धरणाने यंदा वेळेपूर्वीच तळ गाठला आहे.

Swapnil S

उरण : उरण तालुक्याची जीवनवाहिनी असलेल्या एमआयडीसीच्या रानसई धरणाची पाणीपातळी अत्यंत चिंताजनक पातळीवर खालावली असून धरणाने यंदा वेळेपूर्वीच तळ गाठला आहे. धरणातील मुख्य पाणीसाठा पूर्णपणे संपल्याने आता प्रशासनाला मृत साठ्यातून पाणी उपसा करावा लागत आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ८३ फुटांवर पोहोचली असून मृतसाठ्याची अंतिम मर्यादा ८१ फूट आहे. यंदा उन्हाचा कडाका वाढल्याने धरणातील जलसाठा वेगाने आटला असून पूर्वी धरणातील पाणी दररोज २ इंचाने कमी होत होते, मात्र आता तीव्र उष्णतेमुळे हे प्रमाण दिवसाला ३ इंचांवर आले आहे. उपलब्ध पाणी जेमतेम २५ जूनपर्यंतच पुरू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

उरण तालुक्याला दररोज सुमारे ४० एमएलडी पाण्याची आवश्यकता भासते. पुढील महिनाभराचे नियोजन कोलमडू नये, यासाठी एमआयडीसीने सिडकोच्या हेटवणे धरणातून दररोज ४ एमएलडी पाणी विकत घेण्यास सुरुवात केली आहे. रानसई धरणावर तालुक्यातील २४ ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद यांसह ओएनजीसी, एनएडी आणि बीपीसीएल सारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची तहान अवलंबून आहे.

FSSAI चा दणका! दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह मोठ्या ब्रँड्सना १५० हून अधिक नोटिसा

Toxic चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात दुर्घटना; साउंड सिस्टम कोसळून ४ जण जखमी, Video

गर्दीच्या नियोजनासाठी उड्डाणपूल, दुभाजकांवर लोखंडी बॅरिकेड्सचे ग्रीन कव्हर; गणेशोत्सवात लालबाग-परळ परिसरात विशेष खबरदारी

Mumbai : गणपती आगमन मिरवणुकीला गालबोट! भुलेश्वरच्या राजाची मूर्ती कोसळून २ ठार, ५ जखमी; VIDEO

कुर्ला-वांद्रे पॉड टॅक्सी प्रकल्प: बांधकामावर स्वतंत्र अभियंता ठेवणार नजर; AI वर चालणाऱ्या ड्रायव्हरलेस यंत्रणेत असतील २२ स्थानके