उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक (Photo-X)
नवी मुंबई

उरण : जेएनपीए बंदरावर तीन कोटींचे बेकायदेशीर फटाके जप्त; DRI च्या अधिकाऱ्यांची कारवाई, मुख्य संशयिताला अटक

नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

Swapnil S

उरण : नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सिंडिकेट सदस्याला अटक करण्यात आली आहे.

तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या तीन रांगांमध्ये 'बाटल्या आणि वॉलपेपर' असा घोषित केलेला माल आढळला. मात्र, या मालाच्या आड कंटेनरच्या उर्वरित भागात '२८८ गॅटलिंग' या नावाने ओळखले जाणारे तब्बल १९ हजार ८०० बेकायदेशीर फटाके लपवून आणण्यात आल्याचे आढळून आले. घोषित मालासह लपवलेले फटाके सीमा शुल्क कायद्यानुसार जप्त करण्यात आले आहेत.

परदेशी व्यापार धोरणानुसार डीजीएफटीची वैध परवानगी तसेच आवश्यक परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र, जप्त फटाक्यांच्या आयातीसाठी आवश्यक मंजुरी किंवा परवाना घेण्यात आला नव्हता.

व्यावसायिक मालाच्या नावाखाली चुकीची घोषणा करून प्रतिबंधित फटाके बंदरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय आहे. या संपूर्ण नेटवर्कचा डीआरआयकडून सखोल तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना दिलासा; कलिना भूखंड घोटाळा प्रकरणातून दोषमुक्त

Mumbai : बाप्पा निघाले गावाला; नैसर्गिक व कृत्रिम विसर्जनस्थळी BMC ची जय्यत तयारी

दुष्काळाच्या चर्चेसाठी अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरे यांची मागणी

Mumbai : साहील वाकोडे मृत्यूप्रकरणी पालकांचे आझाद मैदानावर उपोषण; राहुल गांधींचा वाकोडे कुटुंबाला फोन, आंदोलनाला दिला पाठिंबा

५ राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा सर्वाधिक खर्च; एकट्या बंगालमध्ये खर्च केले २८६.९९ कोटी रुपये, खर्च विवरणपत्रावरून माहिती उघड