संपादकीय

आरोग्य वार्ता : गोमुत्राचे सेवन मानवी आरोग्याला अपायकारक

नवशक्ती Web Desk

नवीन संशोधनानुसार आरोग्यासाठी गोमुत्र सेवन करणे हे लाभापेक्षा तोट्याचे आहे, असे सिद्ध झाले आहे. जाणून घेऊ या विषयीची माहिती.

लेखक : डॉ. राजाराम जोंधळे

आयुर्वेदाचा संदर्भ देऊन काही आजारांमध्ये गोमूत्राचे सेवन फायदेशीर असल्याचे सांगत ते पिण्याचा सल्ला अनेक वेळा दिला जातो; मात्र असे असले तरी गोमूत्र सेवन करणे मानवासाठी चांगले नाही, असे नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

या संशोधनानुसार, यातील काही बॅक्टेरिया हानिकारक ठरू शकतात. उत्तर प्रदेशमधील बरेली येथील ‘इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट’ (आयव्हीआरआय) या देशातील प्रमुख प्राणी संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात असे आढळून आले की म्हशीचे मूत्र काही जीवाणूंवर अधिक प्रभावी ठरते. गेल्या काही वर्षात आपल्या देशात गायीवरून जोरदार राजकारण सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. गाईचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि गाय हा किती उपयुक्त पशू आहे हे पटवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असतात आणि गाईचे मूत्र अर्थात गोमूत्र हे किती फायदेशीर आहे हे कायमच सांगितले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये गोमुत्राचे खूप महत्त्व असून अनेक शुभकार्यात गोमुत्राचा वापर केला जातो. तसेच ताजे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते. अनेक आजारांवर उपाय म्हणून गोमुत्र प्यायला दिले जाते; मात्र नुकत्याच झालेल्या संशोधनामध्ये गोमुत्रात असणारे धोकादायक बॅक्टेरिया मनुष्यासाठी धोकादायक ठरतात, अशी माहिती समोर आली आहे.

भारतीय बाजारपेठेत अनेक पुरवठादारांकडून गोमूत्र मोठ्या प्रमाणावर भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) ट्रेडमार्कशिवाय विकले जाते. बरेली येथील ‘इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट’ (आयव्हीआरआय)संस्थेत भोजराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांनी गोमुत्राचा मानवावर वापर करण्याबाबत संशोधन केले. या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की निरोगी गायी आणि बैलांच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये किमान १४ प्रकारचे हानिकारक जीवाणू असतात. त्यात एस्चेरिचिया कोलायचा समावेश आहे. त्यामुळे पोटात संक्रमण होऊ शकते. या संशोधनाचे निष्कर्ष ‘रिसर्चगेट’ या ऑनलाईन संशोधन वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या संस्थेतील एपिडेमियॉलॉजी विभागाचे प्रमुख असलेले सिंग म्हणाले की, गाय, म्हशी आणि मानवाच्या ७३ लघवीच्या नमुन्यांचे सांख्यिकीय विश्लेषण सांगते की, किटाणूंच्या वाढीस प्रतिबंध करणारे म्हशीच्या मूत्रातील घटक पदार्थ गोमुत्रापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही

CSMT तील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी आजपासून १५ दिवस ब्लॉक

घशाच्या इन्फेक्शनमुळे अजितदादा मोदींपासून दूर, आजपासून प्रचारात सहभागी होणार