Diwali Fashion Tips : दिवाळी पार्टीसाठी साडीपासून इंडो-वेस्टर्नपर्यंत हटके लूक; अभिनेत्रींच्या स्टाइलमधून घ्या फॅशन टिप्स 
फोटो

Diwali Fashion Tips : दिवाळी पार्टीसाठी साडीपासून इंडो-वेस्टर्नपर्यंत हटके लूक; अभिनेत्रींच्या स्टाइलमधून घ्या फॅशन टिप्स

तुम्हालाही यंदा दिवाळी पार्टीत हटके दिसायचे असेल, तर अभिनेत्रींच्या या फॅशनेबल लूकमधून प्रेरणा घेऊ शकता.

किशोरी घायवट-उबाळे

दिवाळी म्हणजे रोषणाई, फराळ आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला जाणारा आनंदाचा सण. दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी पार्टी आणि गेट-टुगेदरचे आयोजन केले जाते. अशावेळी पारंपरिक पोशाखासोबतच काहीतरी वेगळे आणि स्टायलिश घालण्याची इच्छा असते. मात्र, दिवाळी पार्टीसाठी नेमका कोणता ड्रेस निवडावा, असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. तुम्हालाही यंदा दिवाळी पार्टीत हटके दिसायचे असेल, तर अभिनेत्रींच्या या फॅशनेबल लूकमधून प्रेरणा घेऊ शकता. प्रिंटेड स्कर्टपासून लहंगा आणि इंडो-वेस्टर्न आउटफिटपर्यंत हे पर्याय नक्की ट्राय करून पाहा.

१. प्रिंटेड स्कर्ट, क्रॉप टॉप आणि शॉर्ट जॅकेट

दिवाळीत पारंपरिक कपड्यांना मॉडर्न टच द्यायचा असेल, तर प्रिंटेड स्कर्ट, क्रॉप टॉप आणि शॉर्ट जॅकेट हा उत्तम पर्याय ठरू शकतो. अभिनेत्री परिणीती चोप्राच्या या लूकमध्ये प्रिंटेड घेरदार स्कर्टसोबत मॅचिंग क्रॉप टॉप आणि एम्ब्रॉयडरी केलेले छोटे जॅकेट पाहायला मिळते. हा पोशाख दिवाळी पार्टीसाठी स्टायलिश आणि आकर्षक दिसेल.

२. लॅव्हेंडर रंगाचा लहंगा

दिवाळी पार्टीत रॉयल आणि एलिगंट लूक हवा असेल, तर लॅव्हेंडर रंगाचा लहंगा निवडू शकता. सारा तेंडुलकरच्या या लूकमध्ये हलक्या लॅव्हेंडर आणि निळ्या रंगाच्या लहंग्यावर फुलांची नक्षी, धाग्यांचे काम आणि चमकदार सजावट करण्यात आली आहे. यासोबत हलका नेटचा दुपट्टा आणि मोत्यांनी सजवलेली पोटली बॅग वापरल्यास लूक अधिक सुंदर दिसेल.

३. धोती पँट आणि क्रॉप टॉप

पारंपरिक कपड्यांपेक्षा काहीतरी वेगळे घालण्याचा विचार करत असाल, तर धोती पँट आणि क्रॉप टॉपचा पर्याय निवडा. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लाल रंगाच्या इंडो-वेस्टर्न लूकमध्ये धोती स्टाइल पँट, एम्ब्रॉयडरी केलेला क्रॉप टॉप आणि त्यावर मॅचिंग केप पाहायला मिळते. यासोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी घातल्यास पार्टीसाठी हटके लूक तयार होऊ शकतो.

४. बांधणी कुर्ता आणि शरारा सेट

दिवाळीच्या पारंपरिक वातावरणाला साजेसा आणि आरामदायी पोशाख हवा असेल, तर बांधणी प्रिंटचा शरारा सेट ट्राय करू शकता. निळ्या रंगाच्या या सेटमध्ये कुर्ता आणि घेरदार शरारा आहे. दुपट्ट्याच्या नेकलाइनवर मिरर वर्क आणि मोत्यांची सजावट असेल तर पोशाखाला खास पारंपरिक लूक मिळतो. यासोबत मॅचिंग नेकलेस, झुमके घातल्यास लूक अधिक खुलून दिसेल.

५. पारंपरिक साडीसोबत मॉडर्न स्टाइल

दिवाळी पार्टीसाठी साडी हा नेहमीच आकर्षक पर्याय ठरतो. सिल्क, बनारसी किंवा हलक्या एम्ब्रॉयडरीची साडी निवडून त्यासोबत डिझायनर ब्लाउज घालू शकता. पारंपरिक साडीला स्टायलिश लूक देण्यासाठी स्टेटमेंट इअररिंग्स आणि आकर्षक क्लचची निवड करा.

६. एम्ब्रॉयडरी लहंगा सेट

पार्टीमध्ये उठून दिसायचे असेल, तर सुंदर एम्ब्रॉयडरी असलेला लहंगा सेट निवडा. फुलांची नक्षी, मिरर वर्क किंवा हलक्या चमकदार सजावटीचा लहंगा दिवाळीच्या रोषणाईत खुलून दिसेल. यासोबत हलका दुपट्टा आणि नाजूक दागिने घातल्यास लूक अधिक आकर्षक होईल.

७. इंडो-वेस्टर्न ड्रेस

पारंपरिक आणि वेस्टर्न फॅशनचा संगम आवडत असेल, तर इंडो-वेस्टर्न ड्रेस ट्राय करू शकता. क्रॉप टॉपसोबत फ्लोई स्कर्ट, केप किंवा जॅकेट असा पर्याय निवडता येईल. या पोशाखामुळे तुम्हाला मॉडर्न लूक मिळेल आणि दिवाळी पार्टीतही तुम्ही वेगळ्या स्टाइलमध्ये दिसाल.

दिवाळी पार्टीसाठी ड्रेस निवडताना केवळ ट्रेंड पाहू नका, तर पोशाखात तुम्हाला आरामदायी वाटते का, याकडेही लक्ष द्या. योग्य अ‍ॅक्सेसरीज, हेअरस्टाइल आणि मेकअपची जोड दिल्यास तुमचा सणासुदीचा लूक अधिक खास होऊ शकतो.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"श्यामभाऊ मोठ्या भावासारखे"; चापट मारल्याच्या व्हिडीओवर प्रतिभा धानोरकरांची पहिली प्रतिक्रिया

आता दर ४ मिनिटे २५ सेकंदांनी मेट्रो; मुंबई मेट्रो-३ च्या फेऱ्यांमध्ये वाढ

Thane Accident : घोडबंदर मार्गावर टेम्पोला धडकून केमिकल टँकर उलटला; एक जखमी, दोन्ही दिशांची वाहतूक विस्कळीत

राष्ट्रवादी अजित पवार गटात नाराजीचा स्फोट; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रारीचा सूर, देवगिरीवर आमदारांची बैठक

अनिल अंबानी समूहाप्रकरणी ED ची माेठी कारवाई; ५१० कोटींच्या संपत्तीवर टाच